Margao News : डॉ. व्‍यंकटेश हेगडे रुग्‍णांचे ‘देवदूत’

अनेकांचा वाचविला जीव : शंभरपेक्षा जास्‍त वेळा केले रक्तदान
Dr. Venkatesh Hegde
Dr. Venkatesh HegdeDainik gomantak
Published on
Updated on

Margao News : जगात जी काही श्रेष्ठ स्वरूपाची दाने मानली जातात, त्यापैकी एक म्हणजे रक्तदान. याचे कारण म्हणजे या दानामुळे कुठल्याही व्यक्तीचा जीव वाचू शकतो. मडगाव येथील सामाजिक कार्यात रस घेणारे सेवाभावी डॉ. व्‍यंकटेश हेगडे हे त्‍यांपैकीच एक. आतापर्यंत शंभरपेक्षाही जास्‍तवेळा रक्‍तदान करुन त्‍यांनी एक विक्रमच प्रस्‍थापीत केला आहे असे म्‍हणावे लागेल.

मडगावात प्रॅक्‍टिस करणारे आणि सध्‍या आर्ट ऑफ लिव्‍हिंग या संस्‍थेशी संलग्‍न असलेले डॉ. हेगडे यांनी वयाच्‍या १८व्‍या वर्षापासून रक्‍तदान करण्‍यास सुरूवात केली होती. वयाची साठी गाठेपर्यंत त्‍यांनी नियमितपणे रक्‍तदान केले. वर्षातून किमान तीनवेळा मी रक्‍तदान करायचोच असे त्‍यांनी सांगितले.

Dr. Venkatesh Hegde
Margao : मानसिक ताण अनेक व्याधींचे आहे मूळ - डॉ. व्यंकटेश हेगडे

रक्‍तदान करावे असे का वाटले? असे विचारले असता हेगडे यांनी गोव्‍यातील ७०च्‍या दशकातील परिस्‍थिती वर्णन केली. ते म्‍हणाले, त्‍यावेळी एवढे प्रगत तंत्रज्ञान नसल्‍यामुळे कुणावरही शस्‍त्रक्रिया करणे म्‍हणजे ते एक दिव्‍य होते. या शस्‍त्रक्रियांदरम्‍यान बऱ्याच प्रमाणावर रक्‍त वाहून जायचे. त्‍यामुळे रुग्‍णाला रक्‍त द्यावे लागत असे. मडगावच्‍या हॉस्‍पिसियो इस्‍पितळात त्‍यावेळी रक्‍तपेढीही नव्‍हती. मी रक्‍त दिले तर त्‍यातून कुणाचा तरी जीव वाचू शकतो असे वाटल्‍यामुळेच त्‍याकडे वळलो गेलो.

Dr. Venkatesh Hegde
Margao News : जुनी वाहने भंगारात काढण्याऐवजी कोळसा वाहतूक बंद करा; युवा काँग्रेसची मागणी

त्‍यानंतर हेगडे हे स्‍वत: डॉक्‍टरकीचे शिक्षण घेताना त्‍यांचा रुग्‍णांशी सतत संपर्क येऊ लागला. गोवा वैद्यकीय महाविद्याल इस्‍पितळात त्‍यावेळी रक्‍तपेढी होती. त्‍या रक्‍तपेढीत जास्‍तीत जास्‍त रक्‍त जमा व्‍हावे यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले. मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन, महिला नूतन हायस्‍कूल, दामोदर हायस्‍कूल आदींच्‍या माध्‍यमांतून त्‍यांनी रक्‍तदान शिबिरे आयोजित करण्‍यास सुरूवात केली.

त्‍यापूर्वी त्‍या संस्‍थांमध्‍ये जाऊन रक्‍तदानाचे महत्त्‍व काय आणि एकदा रक्‍त दिले तर दिलेल्‍या रक्‍ताची मात्रा अवघ्‍या तीन महिन्‍ंयात भरुन येते हे पटवून देण्‍याचा त्‍यांनी सगळीकडे प्रयत्‍न केला. ते सांगतात, त्‍यावेळी रक्‍तदानाविषयी आजच्‍ याएवढी जागृती नव्‍हती. त्‍यामुळे त्‍याचे महत्त्‍व पटवून देण्‍यासाठी जागृती करण्‍याचे काम मी सुरू केले. त्‍यावेळी गोमेकॉत कुमूद सरदेसाई नावाच्‍या जनसंपर्क अधिकारी होत्‍या. त्‍यांनी या कामात मला भरपूर मदत केली.

Dr. Venkatesh Hegde
Margao Accident: भावाला वाचवताना दहा वर्षीय बहिणीचा दुर्दैवी अंत

गरजू रुग्‍णांनी येथे साधावा संपर्क

आर्ट ऑफ लिव्‍हिंग’ या संस्‍थेतर्फे सध्‍या ऑनलाईन रक्तपेढी चालविली जाते. www.savelifeindia.org या संकेतस्‍थळावर वेगवेगळ्‍या भागातील रक्‍तदात्‍यांची यादी व फोन नंबर दिलेले असतात. कुणीही रुग्‍ण गरजेच्‍यावेळी या साईटवर जाऊन त्‍या रक्‍तदात्‍यांशी संपर्क करू शकतो असे डॉ. हेगडे यांनी सांगितले. गोव्‍यात आर्ट ऑफ लिव्‍हिंगसाठी समीर कुंकळयेकर हे या बाबतीत चांगले काम करत असल्‍याचेही ते म्‍हणाले.

त्‍याकाळी आम्‍ही रक्‍तदात्‍यांचा एक ग्रुप तयार केला होता. गरज पडल्‍यास ते रक्‍तदान करायचे. मडगावच्‍या हॉस्‍पिसियो इस्‍पितळात अशीच एक ॲक्‍सिडेंट केस आणली होती, जिथे रुग्‍णाला तातडीने रक्‍ताची गरज होती. त्‍यावेळी मी आणि माझ्‍या मित्रांनी रक्‍तदान केल्‍यामुळे त्‍याचा जीव वाचू शकला. त्‍याकाळी आजच्‍यासारखे फोन नव्‍हते. त्‍यामुळे मध्‍यरात्री बाणावली येथे जाऊन एका दात्‍याला उठवून आणावे लागले होते.

डॉ. व्‍यंकटेश हेगडे, समाजकार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com