Crime | Arrest Canva
गोवा

Margao Crime: 'रुबेन'ला कोणत्‍याही क्षणी अटक होणार! मडगाव अपहरण प्रकरण; जामीन अर्ज फेटाळला

Margao Crime News: मडगाव पोलिसांनी वेर्णेकर याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला होता. संशयित वेर्णेकर अजून आम्‍हाला सापडलेला नाही. मात्र आम्‍ही त्‍याच्‍या मागावर आहोत. मिळेल तेथून आम्‍ही त्‍याला अटक करू, अशी माहिती पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao kidnapping case

मडगाव: येथील सोन्‍याचे व्‍यावसायिक कुणाल रायकर यांच्‍या अपहरणाच्‍या प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार असण्‍याची शक्‍यता असलेला मडगावातील आणखी एक सोन्‍याचा व्‍यापारी रूबेन वेर्णेकर याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी फेटाळून लावला. त्‍यामुळे रुबेन याला कोणत्‍याही क्षणी अटक होऊ शकते.

मडगाव पोलिसांनी वेर्णेकर याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला होता. संशयित वेर्णेकर अजून आम्‍हाला सापडलेला नाही. मात्र आम्‍ही त्‍याच्‍या मागावर आहोत. मिळेल तेथून आम्‍ही त्‍याला अटक करू, अशी माहिती पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली. शुक्रवारी सकाळी रूबेन याला चौकशीसाठी फातोर्डा पोलिस स्‍थानकावर बोलावून घेतले होते. त्‍यामुळे पोलिसांनीच त्‍याला ताब्‍यात घेतले अशा आशयाची चर्चा सुरु झाली होती. पण त्‍याला अटक केली नव्‍हती अशी माहिती पोलिसांनी दिली.

अटकेसाठी केली मागणी

गुरुवारी पोलिसांकडून या जामीन अर्जाला विरोध करताना एका दुकानाच्‍या सेल डीड करण्‍याच्‍या वरून कुणाल व रूबेन यांच्‍यात वाद चालू होता. त्‍या दुकानाची सेलडीड करावी यासाठी रूबेन कुणालवर दबाव आणत होता.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता, रूबेननेच भाडोत्री गुंड आणून रायकर यांचा अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केला असावा अशी शक्‍यता पोलिसांनी व्‍यक्‍त केली होती.

सध्‍या या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्‍थेत असल्‍याने आणि या अपहरणात नेमका कुणाचा हात आहे हे जाणून घेण्‍यासाठी वेर्णेकर याला अटक करून त्‍याची चौकशी करणे गरजेचे असल्‍याचे म्‍हटले होते.

मागच्‍या काही दिवसांत वेर्णेकर याने कुणाकुणाशी संपर्क साधला हे तपासण्‍यासाठी त्‍याच्‍या फोनचे कॉल डिटेल्‍स मागितले आहेत असेही पोलिसांनी नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT