Jama Masjid JD
गोवा

Margao Jama Masjid: जामा मशिदीमध्ये आपलीच समिती अधिकृत; उर्फान मुल्ला यांचा दावा

Urfan Mulla: नाव न घेता हाज कमिटीचे चेअरमन उर्फान मुल्ला यांनी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर घाणाघात केला

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मालभाट - मडगाव येथील जामा मशिदीमध्ये आपल्या अध्यक्षतेखाली निवडून आलेली कार्यकारी समितीच अधिकृत असल्याचा दावा उर्फान मुल्ला यांनी आज केला. त्यांनी सांगितले, की विरोधी गटाने निवडणूक प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयातही धाव घेतली.

मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला व निर्णय आमच्या बाजूने दिला. त्यामुळे २०२३ ते २०२८ पर्यंत आपलीच समिती असेल, असे उर्फान मुल्ला यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले, की धार्मिक समित्यांमध्ये राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये. विरोधी गट दिगंबर कामत यांच्यावर हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करतात, पण कामत किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी कधीही जामा मशिदीच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही. विरोधी गटाचा हा दावासुद्धा राजकीय हेतूने प्रेरित आहे.

विजय सरदेसाईंवर घणाघात

जामा मशिदीमध्ये हस्तक्षेप आणि लुडबुड करणे फातोर्ड्याच्या मॉन्स्टरने थांबवावे. मशिदीत राजकारण आणण्यास व फूट पाडण्यात हाच मॉन्स्टर कारणीभूत आहे, असे नाव न घेता हाज कमिटीचे चेअरमन उर्फान मुल्ला यांनी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर घाणाघात केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT