Ration Card  Dainik Gomantak
गोवा

Ration Card Applications : ‘ऑफलाइन’ रेशनकार्ड अर्ज स्वीकारण्यास सरकारची मंजुरी

Ration Card : लोकांना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे हस्तांतरण, तसेच निलंबित शिधापत्रिकांसंबंधी अर्ज सादर करताना सरकारच्या कोलमडलेल्या इंटरनेट नेटवर्क व नागरी पुरवठा खात्याची बंद असलेली पोर्टल यामुळे प्रचंड अडचणी आल्या, असे डिकॉस्ता म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Ration Card Applications :

मडगाव, सरकारी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, भाजप सरकारने अखेर शिधापत्रिकांशी संबंधित ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना जारी केल्या.

नागरी पुरवठा विभागाचे ऑनलाइन पोर्टल कोलमडल्यामुळे अडचणींचा सामना करणाऱ्या सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी म्हटले आहे.

लोकांना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे हस्तांतरण, तसेच निलंबित शिधापत्रिकांसंबंधी अर्ज सादर करताना सरकारच्या कोलमडलेल्या इंटरनेट नेटवर्क व नागरी पुरवठा खात्याची बंद असलेली पोर्टल यामुळे प्रचंड अडचणी आल्या, असे डिकॉस्ता म्हणाले.

सरकारने लोकांप्रती संवेदनशील राहून जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर तत्परतेने काम केले पाहिजे. माझ्या वैयक्तिक पाठपुराव्यानंतरही बऱ्याच दिवसांनी सरकारला जाग आली हे खरोखरच खेदजनक आहे, असे डिकॉस्‍ता यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT