Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चोर तर चोर, वर शिरजोर! लुटलेली सोनसाखळी बँकेत गहाण ठेवून घेतलं कर्ज, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Theft: मडगावातून एका वृद्धेची सोनसाखळी पळवून ती कर्नाटकात बँकेत गहाण ठेवून कर्ज काढण्याचे धाडस एकाने केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मडगावातून एका वृद्धेची सोनसाखळी पळवून ती कर्नाटकात बँकेत गहाण ठेवून कर्ज काढण्याचे धाडस एकाने केले.

गेल्या शनिवारी झालेल्या या चोरीप्रकरणी मडगाव पोलिसांनी मंगळवारी अब्दुल गनी (३९ ) याला अटक केल्यानंतर त्याने ही कबुली दिली आहे. पोलिसांनी आता तेथील पोलिसांकडे पुढील कायदेशीर सोपस्कारासाठी संपर्क केला आहे.

अधिक चौकशीसाठी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. संशयिताला येथील गांधी मार्केट परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर रितसर अटक केली. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम गावकर पुढील तपास करीत आहेत.

अब्दूलने वाट विचारण्याचा बहाणा करून मार्था मीरा (७७) या वृध्देची भर दुपारी गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी त्या वृद्धेने मडगाव पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली होती.

काही सेकंदांत संधी

मार्था या मायफेअर अपार्टमेंटमध्ये रहात होत्या. वर्तमानपत्र घेऊन परत घराकडे पायी चालत जात असताना अब्दुल तिच्याकडे आला व त्याने पुढे जाण्यासाठी वाट कुठून आहे, अशी विचारणा केली आणि काही सेकंदात तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. मार्था यांना काहीच कळले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फूड स्ट्रीटचे पाच टक्के बांधकाम पाडा! पालिकेला नोटीस; अन्यथा अवमान याचिका दाखल करणार

Goa Assembly Live: विश्वजीत-युरींत जुंपली!

Bicholim: काजूची झाडे मोहोराने बहरली, बागायतदारांची लगबग; मात्र धुके, वाढत्या मजुरीने चिंता

मुलांच्‍या मनी कुतूहल, चेहरे आनंदले; 'बुलबूल बाल चित्रपट महोत्‍सवा'ला 44 शाळांतून 8 हजार विद्यार्थ्यांची उपस्‍थिती

Mohammed Siraj Appointed Captain: सिराज आता 'कॅप्टन कूल'च्या भूमिकेत; हैदराबाद संघाचं करणार नेतृत्व!

SCROLL FOR NEXT