Margao Court  Dainik Gomantak
गोवा

Margao Firing: गोळीबार प्रकरणी किंग मोमो रसल डिसोझाला जामिन; पासपोर्ट जमा करण्याचे आदेश

पंधरा दिवस पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचेही आदेश

Akshay Nirmale

King Momo Margao Firing: मडगावच्या जूना बाजार येथे पैशांच्या वादातून गोळीबार केल्याप्रकरणी किंग मोमो रसल डिसोझा याला 30 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला. तथापि, त्याला 15 दिवस पोलिस स्टेशनमध्ये दररोज हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच कोर्टाने त्याला त्याचा पासपोर्ट फातोर्डा पोलिस ठाण्यात जमा करण्याचेही आदेश दिले आहेत. याशिवाय हजेरीव्यतिरिक्त मडगाव परिसरात 15 दिवस न येण्याबाबतही त्याला न्यायालयाने फर्मावले आहे.

मडगाव येथील जुन्या मार्केटमधील ए-वन खान फास्टफूड सेंटरचे मालक मशीमुल्ला उर्फ लालू खान यांच्यावर रसेलने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने खान यातून बचावले.

गतवर्षीच्या कार्निव्हल परेडमध्ये रसेल याची ‘किंग मोमो’ म्हणून निवड झाली होती. डिसोझा हा मडगावातील व्यावसायिक असून पूर्वी तो फास्टफूड सेंटर चालवायचा. नंतर ते सेंटर त्याने लालू खान यांना चालवायला दिले. या दुकानाच्या भाडेपट्टी कराराची मुदत संपल्याने ते बंद केले होते.

2 लाख रुपये डिपॉझिट परत करण्यासाठी खान यांनी डिसोझाला फोन केला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळही झाली.

या वेळी भडकलेल्या डिसोझाने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. लालू खान पळून गेल्याने बचावले. त्यानंतर डिसोझा स्वतःहून फातोर्डा पोलिस ठाण्यात पोलिसांना शरण आला.

याप्रकरणी डिसोझाला पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास डिसोझाने गोळीबार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT