Sanjiv Khandelawl Maka Naka Plastic Movement: गेल्या काही वर्षात प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबाबत जागृती होत आहे. तथापि, प्लॅस्टिकचा वापर काही थांबलेला नाही.
सरकारसह वैयक्तिक पातळीवर अनेकजण आपापल्यापरीने प्लॅस्टिकचा वापर कमी कसा करता येईल, याचा प्रयत्न करत असतात.
गोव्यातही एका अवलियाने अशी मोहिम राबवली आहे. माका नाका प्लॅस्टिक असे या मोहिमेचे नाव आहे. आणि ही मोहिम चालवतात संजीव खंडेलवाल. विशेष म्हणजे, या मोहिमेतून जागृती करत खंडेलवाल यांनी सुमारे 20 लाख प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर थांबवला आहे.
गोव्यात प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी संजीव खंडेलवाल यांनी ही मोहिम सुरू केली आहे. खंडेलवाल प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या समस्यांची लोकांना जाणीव करून देतात आणि प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्यास प्रवृत्त करतात.
माका नाका प्लॅस्टिक मोहिमेतून संजीव खंडेलवाल यांनी तीन मुद्द्यांकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.
पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करणे, लोकांना कापडी पिशव्या वापरण्याकडे वळवणे आणि या कापडी पिशव्या बनवणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे.
गेल्या दोन वर्षांत संजीव खंडेलवाल यांनी अनेक सर्वसामान्य नागरिकांना आपल्या बाजूने वळवले आहे.
गोवा हे दरडोई सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारे राज्य असल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या आगमनामुळे गोव्यात प्लॅस्टिक कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे संजीव खंडेलवाल यांनी माका नाका प्लास्टिक मोहीम सुरू केली.
2019-20 च्या अहवालानुसार, गोव्यात प्रति व्यक्ती प्रतिवर्षी 12 किलो प्लास्टिक कचरा निर्माण करते.
सेन्सिबल अर्थचे संस्थापक संजीव खंडेलवाल यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोरोना संकटानंतर माका नाका प्लास्टिक मोहीम सुरू केली.
गोव्यातील लोकांचा प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर कमीत कमी पातळीवर आणावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.