Margao
Margao   Dainik Gomantak
गोवा

Margao News : वेळ्‍ळीतील रस्‍त्‍यांची खोदकामामुळे दुर्दशा

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, भूमिगत वीजवाहिन्‍या व गॅस वाहिनीसाठी अनेक ठिकाणी रस्‍त्‍याचे खोदकाम करण्‍यात आले असून हे खोदलेले रस्‍ते आता अपघाताला आमंत्रण देत आहेत.

वेळ्‍ळी मतदारसंघात बागा परिसरातील रस्‍त्‍यांची दुर्दशा झाली असून या ठिकाणी एखाद्याचा बळी जाण्‍यापूर्वी हे रस्‍ते दुरुस्‍त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

खोदलेल्‍या रस्‍त्‍यांची तात्‍पुरती डागडुजी करण्‍यात आली असली ती व्‍यवस्‍थित न केल्‍यामुळे हे रस्‍ते धोकादायक बनले आहेत. त्‍यामुळे वाहने रुतून बसण्‍याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. स्‍थानिकांनी ज्‍या ठिकाणी धोकादायक स्‍थिती बनलेली आहे, त्‍या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्‍हणूून माडाच्‍या झावळ्‍या टाकल्‍या आहेत. तसेच झाडांच्‍या फांद्या लावल्‍या आहेत.

भर पावसात काही ठिकाणी काम सुरू ठेवल्‍याने रस्‍त्‍यावर सर्वत्र चिखल पसरुन रस्‍ता निसरडा होत असल्‍याने विशेषत: दुचाकीचालकांना प्रचंड मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. सध्‍या पावसाळ्‍यात सुरू असलेली खोदकामे बंद करण्‍याचा आदेश जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिला असताना देखील त्‍याकडे दुर्लक्ष करून खोदकाम चालू ठेवल्‍याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक व स्‍थानिक लोकांकडून करण्‍यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: गोव्यात आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून 8 तारखेपर्यंत यलो अलर्ट; हवामान खात्याची माहिती

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT