केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारुन श्रीपाद नाईक गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी श्रीपाद भाऊंचे स्वागत केले.
पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रमाकरिता ४० जागांसाठी प्रवेश ऑक्टोबर पासून, राज्यात लवकरच पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा.
'पेडण्याचा सामारां' या कोंकणी पुस्तकासाठी अद्वैत साळगांवकर याला साहित्य अकादमीचा यंदाचा युवा पुरस्कार जाहीर झाला.
साहित्य अकादमी 2024 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. कोकणी भाषेत हर्षा शेट्ये यांच्या ‘एक आशिल्लें बायलू’ ह्या कादंबरीला पुरस्कार मिळाला. तर मराठीत भारत ससाणे यांच्या ‘समशेर’ आणि ‘भूतबंगला’ या कांदबरीला पुरस्कार मिळाला.
म्हापसा कोर्टासमोरील दुभाजक धोकादायक ठरतोय. पुन्हा एकदा येथे या दुभाजकावर कार चढली. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा अशाप्रकारची घटना घडली आहे. दुभाजक चुकीच्या जागी असल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत शिक्षण आणि कृषी क्षेत्राचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोटसाठी सरकार आता पैसे देणार आहे. त्याचबरोबर ऑक्टोबरपासून पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवेचे कोर्सेसची सुरुवात होणार आहेत. 21 जूनचा जागतिक योगा दिवस यंदा पंचायत पातळीवरही साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
गोवा क्रिकेट असोसिएशनकडून मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, श्रेत्ररक्षण प्रशिक्षक तसेच स्थ्रेंथ एण्ड कंडीशनींग प्रशिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध. पात्र उमेदवारांसाठी 18 जून 2024 अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत.
प्रस्तावीत बोरी पूल आवश्यकच आहे. हा पूल आणि त्याचा जोडरस्ता हा स्टील्टवर बांधण्यात येईल. पुलामुळे शेतांना वा एकाही घराला धोका पोचणार नाही ही माझी जबाबदारी. लवकरच पीडब्ल्युडी अधिकाऱ्यांसोबत बैठक घऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. मंत्री आलेक्स सिक्वेरांचे प्रतिपादन.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक नोंदणीकृत ट्रकने कारला धडक दिल्यानंतर काही अंतर फरफटत नेले. यात कारचालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी केपे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (दि.15) सकाळी सहा वाजता केपे न्यायालयासमोर हा अपघात झाला.
वेगळे-सत्तरीत गुरांच्या तस्करीचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. स्थानिकांना दोघांना पकडून केले वाळपई पोलिसांच्या स्वाधीन. रात्री दहाच्या सुमारास घडला प्रकार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.