Goa News dainik gomantak
गोवा

Goa News : मडगाव दिंडीनिमित्त मनोरंजनाची खमंग मेजवानी

टीव्ही स्टार्सचे आकर्षण : विविध स्पर्धांसह बहारदार संगीत मैफल

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : यंदा मडगाव दिंडीनिमित्त युव संजीवनीतर्फे रविवार, ६ रोजी भरगच्च कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छोट्या पडद्यावरील चमकते सितारे, हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक शर्मद पै रायतुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष नाईक, सरचिटणीस उत्कर्ष कोल्हापूरकर, खजिनदार साईराज कामत, ओजल राऊळ, अर्नव रासईकर उपस्थित होते. रविवारी सकाळी १०.३० वाजता ‘ट्रेजर हंट’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत एका गटात दोन स्पर्धकांचा समावेश असेल. सायंकाळी ४ वाजता पाककला स्पर्धा होईल. यात स्पर्धकाला केळ्यांपासून गोड पदार्थ व अळंबीपासून तिखट पदार्थ तयार करून आणावा लागेल. स्पर्धकांनी पाककृती लिहून आणणे गरजेचे आहे.

संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून अखिल गोवा प्रतिभा शोध स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत कलाकारांना नृत्य, गायन, जादू, योगासन प्रात्यक्षिके, अभिनय यासारख्या कलांचे सादरीकरण करावे लागेल. त्याच दिवशी रात्री ९ वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल. या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाम नीलेश काब्राल, आमदार दिगंबर कामत यांना आमंत्रित केले आहे. यावेळी ‘गोमन्तक’चे सासष्टी प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार मंगेश बोरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

संगीतप्रेमींसाठी पर्वणी

रात्री १० वाजता ‘स्वरदिंडी’ ही हिंदी, कोकणी व मराठी गीतांची मैफल होईल. या मैफलीत सारेगमप झी मराठी व कलर्स टीव्हीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता अनिरुद्ध जोशी (नागपूर), संज्योती जगदाळे (पुणे) नवाब शेख (वास्को) आणि स्थानिक गायक कलाकार खुशबू हळदणकर भाग घेणार आहे. गोविंद भगत यांचे निवेदन असेल तर गायकांना विष्णू शिरोडकर व सहकारी वाद्यसंगीत साथ देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT