Margao Building  Dainik Gomantak
गोवा

Margao Building : मडगावातील जीर्ण इमारती पाडण्याचा जिल्हाधिकारी चंद्रू यांचा आदेश

Margao Building : गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने मडगावमध्ये सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. त्यांनी मडगावमधील असुरक्षित इमारतींची पाहणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Building : सासष्टी, मडगावात अनेक जीर्ण इमारती आहेत. दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी पाडाव्यात, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ए आश्र्विन चंद्रू यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. नगरपालिकेने या पूर्वीच या इमारती असुरक्षित घोषित केल्या आहेत.

जिल्हाधिकारी चंद्रू हे दक्षिण गोवा जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख असून त्यांनी हा आदेश आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५च्‍या अधिकाराप्रमाणे जारी केला आहे. यापूर्वी जीर्ण म्‍हणून घोषित केलेल्‍या एका इमारतीत व्‍यावसायिक आस्‍थापन सुरू केल्‍याने सुरक्षेचा प्रश्‍न पुन्‍हा ऐरणीवर आला आहे. या जीर्ण इमारतीत व्‍यावसायिक आस्‍थापन कसे सुरू झाले, याबद्दल लोक प्रश्‍न विचारात आहेत.

नगरपालिकेने मे २०१८ मध्ये गोवा नगरपालिका १९६८ कायद्याखाली या इमारती असुरक्षित जाहीर केल्या होत्‍या. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने मडगावमध्ये सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. त्यांनी मडगावमधील असुरक्षित इमारतींची पाहणी केली.

नगरपालिकेने २० इमारती असुरक्षित म्हणून जाहीर केल्या असून त्यातील गांधी मार्केटमधील काजा मिनेझीस इमारत मालकानेच हल्लीच पाडली. नगरपालिकेने या इमारती पाडण्यासाठी उपाययोजना केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश काढावा लागला, असे बोलले जाते. असुरक्षित इमारतीत आस्थापन चालविण्यास नगरपालिकेने व्यापारी परवाना कसा काय दिला? याची चौकशी करावी, असे कुतिन्होचे म्हणणे आहे.

नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले, या आस्‍थापनाला पालिकेच्‍या कार्यालयातून विक्री परवाना प्राप्‍त झाला आहे. यासंदर्भात इमारतीच्‍या मालकाशी आपण संपर्क साधला होता. मात्र ही इमारत पाडण्‍यासाठी एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. आपल्‍या कारकिर्दीत आपण कुठल्‍याही बेकायदेशीर आस्‍थापनाला थारा देत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

SCROLL FOR NEXT