Goa Updates 02 December 2023: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

न्हयबाग-पोरस्कडे येथे ट्रकचा अपघात
Goa Live Updates 02 December 2023 | Goa Breaking News
Goa Live Updates 02 December 2023 | Goa Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak

न्हयबाग-पोरस्कडे येथे ट्रकचा अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर न्हयबाग-पोरस्कडे येथे एका ट्रकचा (GA 04 T 3883) अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडरवर गेला आणि तिथेच अडकून बसला. येथे पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे.

साखळीत मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या जनतेच्या समस्या; तक्रारींवर तत्काळ कार्यवाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज, शनिवारी त्यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीमध्ये होते. त्यांनी तिथे राज्यभरातून आलेल्या लोकांच्या समस्या ऐकल्या. ज्यांची सोडवणूक लगेच शक्य आहे तिथे संबंधितांना त्यांनी लगेचच तशा पद्धतीच्या सूचना केल्या.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा रक्षकाकडे सापडला तंबाखूजन्य पदार्थ

कोलवाळ मध्यवती कारागृहात सुरक्षा रक्षकाकडून तंबाखूजन्य पदार्थ तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याचे समोर येत आहे. संशयित शिवराम असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तो आयआरबीचा सुरक्षा कर्मचारी आहे.

लोकसभा विस्तारक गोव्यात दाखल!

गोव्यासाठीचे लोकसभा विस्तारक सुनील कर्जतकर शनिवारी गोव्यात दाखल झाले. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दयानंद सोपटे यांनी त्यांचे स्वागत केले.

loksabha ekection
loksabha ekectiondainik gomantak

गोव्यातील कथीत पीडब्ल्युडी नोकर भरती घोटाळा हा व्यापम घोटाळ्यासारखाच. हा घोटाळा सिद्ध झाल्यास अनेकांना तुरुंगात जावे लागेल. एल्वीस गोम्स, काँग्रेस नेते

एल्वीस गोम्स, काँग्रेस नेते
एल्वीस गोम्स, काँग्रेस नेतेdainik gomantak

सायबर फसवणूक; गोव्यातील अधिकाऱ्यांना संवादात्मक कार्यशाळा

देश पातळीवर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीच्या One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (Paytm) यांच्या सहकार्याने रायबंदर येथील सायबर गुन्हे शाखेतर्फे सायबर क्राईम आर्थिक फसवणुकीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या गोवा पोलीस अधिकार्‍यांसाठी एक संवादात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

दाबोळीतील विहिरीत पेट्रोलियम घटक; स्वयंपाकासाठीही पाण्याची चणचण! कारवाई तीव्र करण्याची पंचायत सदस्यांची मागणी

माटवे-दाबोळी येथील विहिरींतील पाण्याने पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर विहिरींमध्ये ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थ असल्याचे आढळले.

याबाबत पंचायत सदस्य नीलम नाईक यांनी काल (शुक्रवारी) अज्ञात व्यक्तींविरुद्ध पेट्रोलियम पदार्थांनी विहीर दूषित करून जीवित व मालमत्ता धोक्यात आणल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

ट्रकखाली सापडल्याने खोर्जुवेमधील दुचाकी चालक विदेश पोळे (२३) जागीच ठार. नामोशी रस्त्यावर सकाळी घडला अपघात.

accident
accidentdainik gomantak

गोव्यात नोकरीसाठी घरातून बाहेर पडला, दोन दिवसांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह

गोव्यात रोजगारासाठी घरातून बाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह गोरखपूर रेल्वे स्थानकावर आढळून आला. श्रावण निषाद असे या तरुणाचे नाव असून, तो दोन मित्रांसोबत कामानिमित्त गोव्यात येण्यासाठी निघाला होता. पण, गोव्याकडे निघण्यापूर्वी त्याचा गोरखपूर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली.

हडफडे येथे भीषण अपघात; ऑन स्पॉट तीन पर्यटक ठार, परदेशी नागरिक जखमी

हडफडे येथे भीषण अपघात झाला असून, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. धरधाव कार दुसऱ्या चारचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com