Theft Dainik Gomantak
गोवा

Comba Theft: आधी रेकी केली, एकट्या महिलेला हेरून शिरला घरात! गळ्याला चाकू लावून केली चोरी; तामिळनाडूच्या एकाला अटक

Margao Comba Theft: कोंब येथील चोरीप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या शशिकुमार अखिलेश शर्मा (२०) याने चोरी करण्यापूर्वी चार दिवस त्या घराची रेकी केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कोंब येथील चोरीप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या शशिकुमार अखिलेश शर्मा  (२०) याने चोरी करण्यापूर्वी चार दिवस त्या घराची रेकी केली होती. तो त्या घरावर पाळत ठेवून होता. त्या घरात एकटीच महिला राहत असल्याची माहिती त्याने शोधून काढली होती. मध्यरात्री त्याने आपला डाव साधला. पोलिस तपासात हे उघड झाले.

संशयित तामिळनाडू राज्यातील असून, सध्या त्याला मडगाव पोलिसांनी पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे. त्याचा पूर्वोतिहास पोलिस पडताळून पाहत आहेत. कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांनी दिली. 

१६ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीची वरील घटना घडली होती.  मडगाव पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अतंरावर  हे ठिकाण असतानाही  पोलिसांना मात्र त्याचा सुगावाही  लागला नव्हता.  

 मागाहून  तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून संशयिताला स्टेशन रोड येथे पकडले होते.  त्या घरात कॉर्नी पाशेको ही ४८ वर्षीय महिला एकटीच राहत असल्याचे संशयिताला कळाले  होते. मध्यरात्री पाशेको या गाढ झोपेत असताना शशिकुमार  घराची कौले काढून  आत शिरला होता. 

काही हालचाल होत असल्याची चाहूल लागल्याने कॉर्नी या जाग्या झाल्या असत्या. शशिकुमारने त्यांच्या गळ्यावर चाकू रोखला  व आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली व  घराची चावी मागितली. यावेळी कॉर्नी यांनी हुशारी दाखवून मागच्या बाजूच्या दरवाजातून बाहेर निघून घडलेली घटना शेजाऱ्यांना सांगितली होती. त्यानंतर  या चोरीसंबंधी पोलिसांना माहिती मिळाली होती. नंतर पोलिसांनी तपास करून संशयिताला पकडले.

संशयित शशिकुमारला दारूचे व्यसन

संशयिताने एक मोबाईल व लॅपटॉप चोरून नेला होता. पोलिसांनी ते साहित्य जप्त केले आहे.  पोलिस तपासात शशिकुमार याला दारूचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे.

भारतीय न्याय संहितेच्या ३०९ (२), (६) व ३३१ (८) कलमाखाली संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनुष्का परब पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs NZ: किवींचे 'चक्रव्यूह' टीम इंडियाला भेदता येईल का? टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणाचा वरचष्मा? फायनलपूर्वी धक्कादायक आकडे समोर

Goa Budget 2026: आकड्यांचा खेळ की विकासाचा आराखडा? गोव्याच्या अर्थसंकल्पाबद्दल काय आहेत प्रतिक्रिया? वाचा..

Terrorist Attack in Pakistan: हल्लेखोर दुचाकीवरून आला अन् थेट... पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 18 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Shigao: सफर गोव्याची! दूधसागर नदीच्या तीरावर वसलेले, सदोदित हिरवाईने नटलेले 'शिगाव'

LPG Cylinder Price Hike: मध्य पूर्वेतील युद्धाची झळ सर्वसामान्यांना! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागला! नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT