Konkan Railway News Dainik Gomantak
गोवा

Margao Bandra Express: ‘मडगाव-बांद्रा एक्सप्रेस’ मंदावली! प्रवासी संख्येत घट; थांब्यांवरती विचार करण्याची गरज

Margao to Bandra Express Speed: मुंबई-गोवा इतर गाड्यांमध्ये – जसे की ‘कोंकण कन्या’, ‘मांडोवी एक्सप्रेस’, ‘जनशताब्दी’, ‘एलटीटी-मडगाव एक्सप्रेस’ वगैरे – १२० ते १५० टक्क्यांपर्यंत प्रवासी गर्दी नियमितपणे पाहायला मिळते.

Sameer Panditrao

पणजी: मुंबईतील वसई, बोरीवली व बांद्रा टर्मिनस या पश्चिम रेल्वे स्थानकांना कोकण रेल्वे मार्गाशी थेट जोडणारी पहिली आणि एकमेव ‘मडगाव–बांद्रा एक्सप्रेस’ सेवा सध्या गंभीर पेचात सापडली आहे. तिचा सरासरी वेग केवळ ३८ ते ४० किमी प्रतितास इतकाच नोंदवला जात आहे. परिणामी, ही सेवा सध्या केवळ ५० ते ७० टक्के प्रवासी क्षमतेने धावत आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे.

याउलट, मुंबई-गोवा मार्गावरील इतर गाड्यांमध्ये – जसे की ‘कोंकण कन्या’, ‘मांडोवी एक्सप्रेस’, ‘जनशताब्दी’, ‘एलटीटी-मडगाव एक्सप्रेस’ वगैरे – १२० ते १५० टक्क्यांपर्यंत प्रवासी गर्दी नियमितपणे पाहायला मिळते. ही तफावत हे स्पष्ट संकेत देते की, सद्यःस्थितीत मडगाव-बांद्रा एक्सप्रेसची थांबे योजना अपयशी ठरली आहे.

गाडीला फारच मर्यादित थांबे देण्यात आले असून हे थांबे आधीच अनेक सुपरफास्ट व एक्सप्रेस गाड्यांनी व्यापले आहेत. परिणामी, या गाडीने ना दीर्घ प्रवाशांना फायदा होतो, ना स्थानिक प्रवाशांना. विशेष म्हणजे ही गाडी अनेक लहान व उपेक्षित स्थानकांना पूर्णतः डावलते, जे प्रचंड संभाव्य प्रवासी वर्गाच्या संपर्काबाहेर राहते.

ही सेवा हळूहळू निष्प्रभ होत चालली असून, तिच्या माध्यमातून ‘कोंकण–पश्चिम रेल्वे’ जोडणीसारखा ऐतिहासिक टप्पा फोल ठरत आहे. या मार्गावरील अस्सल गरज मध्यवर्ती व तालुकास्तरीय प्रवाशांची आहे, परंतु त्यांच्यावरच दुर्लक्ष केले गेले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘मडगाव–बांद्रा एक्सप्रेस’ची थांबे योजना १०१०५/१०१०६ दिवा–सावंतवाडी पॅसेंजरप्रमाणे व्यापक व समावेशक करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

ही पॅसेंजर गाडी मध्य रेल्वे व कोकण रेल्वे जोडणारी पहिली सेवा असून, ती स्थानिक स्तरावर प्रचंड लोकप्रिय आहे. अंधेरी, भाईंदर, पेण, नागोठाणे, माणगाव, सापे वामणे, करंजाडी, खेड, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कुडाळ, झाराप, मडूरे आणि पेडणे या थांब्‍यांचा यांचा समावेश केल्यास प्रवाशांची संख्याही वाढेल व सार्वजनिक गुंतवणुकीचा लाभही प्रत्यक्षात उतरेल असे काही प्रवाशांनी कोकण रेल्वे महामंडळाला कळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT