Goa Express: गोव्यात मिळाला नाही रोजगार, गावी माघारी जाताना तुटला पाय; गोवा एक्सप्रेसमध्ये घडला अपघात

Man injured in Goa Express: धर्मेंद्र ट्रेनमधून खाली उतरला. ट्रेन पुन्हा सुरु झाल्यानंतर तो धावत्या ढण्याचा प्रयत्न करत होता पण अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला.
Unemployed man injured while returning from Goa
Goa ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेश: गोव्यात कामाच्या शोधात आलेल्या तरुणाचा गावी माघारी जाताना अपघात झाला. या अपघातात तरुणाने त्याचा एक पाय गमावला आहे. तरुण गोव्यात काम न मिळाल्याने गावी माघारी जात होता. दरम्यान, धावती ट्रेन पकडताना पाय घसरुन त्याचा एक पाय तुटला. मध्य प्रदेशातील, दातिया रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (१८ एप्रिल) सकाळी ही घटना घडली.

धर्मेंद्र कुशवाह असे या तरुणाचे नाव आहे. धर्मेंद्र ग्वाल्हेरचा रहिवासी आहे. गोव्याहून त्याच्या घरी परत जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिस (GRP) घटनास्थळी पोहोचले आणि जखमी धर्मेद्रला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर, गंभीर प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी त्याला झाशी मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले.

Unemployed man injured while returning from Goa
Goa Drug Case: दिल्ली, गोवा विमानतळावरील तपास यंत्रणेला ड्रग्ज तस्करांनी गंडवलं; थायलंडमधून आले होते 43 कोटींचे कोकेन

"धर्मेंद्र रोजंदारीवर काम करतो. तीन दिवसांपूर्वी तो त्याच्या मित्रांसह कामाच्या शोधात गोव्याला गेला होता. गोव्यात काम न मिळाल्याने तो गावी माघारी येत होता. गोवा एक्सप्रेसमधून तो प्रवास करत होता, त्याचवेळी हा अपघात झाला", अशी माहिती धर्मेंद्रचा भाऊ दिनेश कुशवाहा याने एका स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

Unemployed man injured while returning from Goa
Goa Stray Dog Attack: मामाच्या घरी आलेल्या 2 वर्षीय बालिकेचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू; स्थानिक संतप्त

मध्य प्रदेशातील स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र कुशवाह गोवा एक्सप्रेसमधून त्याच्या गावाकडे प्रवास करत होता. दरम्यान, दातिया आणि चिरुला स्थानकांदरम्यान बाह्य सिग्नलवर ही ट्रेन थांबली होती. यावेळी धर्मेंद्र ट्रेनमधून खाली उतरला. ट्रेन पुन्हा सुरु झाल्यानंतर तो धावत्या ढण्याचा प्रयत्न करत होता पण अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. यातचा त्याचा पाय तुटला. तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी रेल्वे प्रशासन तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com