Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: 'मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देणारच'! फोंड्यात निर्धार; मातृशक्ती समित्यांची होणार निवड

Marathi Language Goa Dispute: दरम्यान, येत्या सोमवारी २१ रोजी फोंड्यातील थ्रिफ्ट सभागृहात संध्याकाळी साडेचार वाजता मातृशक्ती समिती निवडण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

फोंडा: मराठी निर्धार समितीच्या सदस्यांनी आता मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देण्यासाठी जोर लावला असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रखंडांच्या सदस्यांसमवेत फोंड्यात आज बैठक घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देणारच असा निर्धार केला.

दरम्यान, येत्या सोमवारी २१ रोजी फोंड्यातील थ्रिफ्ट सभागृहात संध्याकाळी साडेचार वाजता मातृशक्ती समिती निवडण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.या बैठकीला मराठी निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर तसेच समितीचे इतर पदाधिकारी गोविंद देव, डॉ. सुषमा तिळवे, हरिश्‍चंद्र नाईक व संतोष धारगळकर आदी उपस्थित होते. या बैठकीत पणजी, तिसवाडी, फोंडा, शिरोडा, धारबांदोडा व सत्तरी अशा सहा प्रखंडांच्या समिती सदस्यांना प्राचार्य सुभाष वेलिंगकर व इतरांनी मार्गदर्शन केले.

मराठीला मानाचे राजभाषा स्थान मिळवून देण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न पुढील काळात करणे आवश्‍यक असून त्यासाठी मराठी भाषकांनी तयार रहायला हवे. मागचे निर्धार मेळावे यशस्वी झाल्यामुळे सुभाष वेलिंगकर व इतरांनी मराठीप्रेमी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

निर्धार मेळावे यशस्वी

मागच्या काळात एकूण वीस निर्धार मेळावे राज्यभर घेण्यात आले. त्यात १८ प्रखंड मेळावे, तर २ मोठे मेळावे झाले. एकूण वीस मेळाव्यांतून राज्यभर मराठीसाठी जागृती करण्यात आली असून ही जागृती अधिक तीव्र करण्यासाठी आता पुढील काळात नियोजन करण्यात येणार आहे, त्यामुळेच प्रखंड समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

काय झाले निर्णय

पंचायत व ग्राम पातळीवर समित्या निवडणे, मामलेदार, उपजिल्हाधिकाऱ्यांना मराठी राजभाषेची मागणी करणारे निवेदन सादर करणे, संत महंतांची भेट घेऊन मराठीसाठी त्यांचे आशीर्वाद घेणे, विविध सांप्रदायांच्या प्रतिनिधींना मराठी समित्यांवर स्थान देणे, मराठीसंबंधीची पत्रे विविध दैनिकांत छापण्यासाठी देणे, मराठीसंबंधीचे छोटे व्हिडिओ काढून ते प्रसारित करणे, मराठी युवा शक्ती व मातृशक्ती विभाग सक्षम करणे, साहित्यिक, कलाकार यांना मराठीसंबंधीच्या समित्यांवर स्थान देणे, समन्वयकांची नावे सूचवणे, विविध मंदिरांत मराठीला राजभाषा करण्यासाठी गाऱ्हाणे घालणे आणि एकंदरच मराठीसाठीचा आवाज बुलंद करण्यासाठी विविध सूचना यावेळी प्रखंड समितीच्या सदस्यांना देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT