Marathi Rajbhasha Samiti Nirdhar Melava Dainik Gomantak
गोवा

Ponda: फर्मागुढीत होणार ‘निर्धार मेळावा’! मराठीप्रेमींना एकजूट दाखविण्याचे समितीचे आवाहन

Marathi Rajbhasha Samiti: मेळावा आयोजन समितीचे अध्यक्ष शाणुदास सावंत, निर्धार समितीचे मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर तसेच ॲड. मनोहर आडपईकर, जयंत मिरिंगकर, दिवाकर शिंक्रे व विनोद पोकळे आदी उपस्थित होते.

Sameer Panditrao

फोंडा: मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे रविवार, २५ रोजी सायंकाळी ४.३० वा. फर्मागुढी-फोंडा येथील गोपाळ गणपती सभागृहात मराठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी मेळावा आयोजन समितीचे अध्यक्ष शाणुदास सावंत, निर्धार समितीचे मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर तसेच ॲड. मनोहर आडपईकर, जयंत मिरिंगकर, दिवाकर शिंक्रे व विनोद पोकळे आदी उपस्थित होते. यावेळी निर्धार समितीच्या मेळाव्याचा प्रचार आणि प्रसारासाठी डिजिटल माहितीचे उद्‌घाटनही करण्यात आले.

दरम्यान, या मेळाव्याला किमान पाचशे मराठीप्रेमी उपस्थित राहणार असून मेळाव्यात मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे. राज्यात मराठीचा वावर आणि वापर मोठ्या प्रमाणात असून यावेळेला सरकारने मराठीला मानाचे स्थान द्यायलाच हवे, असे विचार गो. रा. ढवळीकर, मनोहर आडपईकर, विनोद पोकळे, जयंत मिरिंगकर, दिवाकर शिंक्रे व उदय डांगी यांनी व्यक्त केले.

राज्यभर जागृती सुरू

मराठी भाषेला राजभाषेचे स्थान डावलल्यामुळे मराठी भाषकांवर अन्याय झाला असून हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने मराठी भाषेला राजभाषेचे स्थान द्यावे, अशी मागणी सातत्याने मराठीप्रेमी करीत आहेत. त्या अनुषंगाने राज्यभर जागृती व्हावी यासाठी अशाप्रकारच्या मेळाव्यांचे आयोजन राज्यात करण्यात येत आहे. त्यातीलच हा एक मेळावा फोंडा तालुक्यात होणार असल्याची माहिती शाणुदास सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT