Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: अभिजात मराठीची हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा जाणून घेण्यासाठी मेळावा, मांद्रे प्रखंडात तयारी जोरात

Marathi Rajbhasha Nirdhar Samiti: मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने मांद्रे प्रखंडाचा प्रथम मेळावा २६ एप्रिल रोजी संध्या. ५.३० वाजता जिल्हा पंचायत सभागृह, मांद्रे येथे होणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी कार्यरत असलेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने मांद्रे प्रखंडाचा प्रथम मेळावा २६ एप्रिल रोजी संध्या. ५.३० वाजता जिल्हा पंचायत सभागृह, मांद्रे येथे होणार आहे.

मेळाव्याची सुरवात पणजीत कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरण बैठकीने झाली होती. त्यानंतर राज्यस्तरीय स्तरावर भव्य मेळावा झाल्यावर आता प्रथम प्रखंडस्तरावरील मेळावा आयोजित करण्यात येत आहे. मांद्रेत होणाऱ्या पहिल्या प्रखंड मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिले आहे.

या मेळाव्याला गो. रा. ढवळीकर व प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्याचे नेतृत्व मांद्रे प्रखंड मराठी राजभाषा निर्धार समिती समन्वयक प्राचार्य गजानन मांद्रेकर करत आहे.

गोव्याला लाभलेली अभिजात मराठी भाषेची हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अभिजात मराठी भाषा गोव्याची राजभाषा का झालीच पाहिजे, हे समजून घेण्यासाठी आणि गोव्यात अभिजात मराठी भाषेवर होणारा अन्याय कायमचा मिटविण्यासाठी तसेच अभिजात मराठी भाषा गोव्याची राजभाषा व्हावी यासाठी एकदिलाने कार्य करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT