Damodar Mauzo Statement Dainik Gomantak
गोवा

Damodar Mauzo Statement: 'मराठीप्रेमी जनतेची मावजोंनी माफी मागावी, अन्यथा...'; राज्यातील मराठी संस्थांकडून कडाडून विरोध

Jnanpith awardee Damodar Mauzo: मावजोंनी मराठीप्रेमी जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठी प्रेमी जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा सज्जड इशारा शुक्रवारी (ता.३०) देण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा कोकणी लेखक दामोदर मावजोंच्या भाषाद्वेषी विधानाने मराठी प्रेमी संतप्त झाले असून, मावजोंनी मराठीप्रेमी जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठी प्रेमी जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा सज्जड इशारा शुक्रवारी (ता.३०) देण्यात आला.

म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दामोदर मावजो यांच्या निषेध सभेत बोलताना प्रत्येकजण हातात दामोदर मावजो यांचा निषेध असो असे फलक घेऊन उभे होते.

म्हापशासह राज्यातील विविध मराठी संस्थांकडून मावजोंच्या भाषाद्वेषी विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

दामोदर मावजो यांनी राजभाषा कायद्यातून मराठीला वगळण्याचे विधान केले होते. त्यांच्या विधानाच्या निषेधार्थ बोलवलेल्या सभेला, सभेचे निमंत्रक मराठी कार्यकर्ता तुषार टोपले, अ‍ॅड. महेश राणे, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर,

मराठी असे आमुची मायबोलीचे प्रकाश भगत, शिवसेना माजी राज्यप्रमुख रमेश नाईक, मगोप केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे, शिवसेना नेते राजेश मराठे, प्रकाश धुमाळ, प्रसाद दळवी, ज्येष्ठ पत्रकार नारायण राटवड,

अरुण नाईक, काशिनाथ आर्लेकर, बाबली कांदोळकर, अर्जुन उगवेकर, सुरेंद्र शेट्ये, एकनाथ म्हापसेकर, भाई मोये, नितीन कोरगांवकर, सुजन नाईक आदी मराठी प्रेमी उपस्थित होते.

गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर म्हणाले, मावजो यांनी मराठीतून शिक्षण घेतले. मराठी वाचून साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अशावेळी मावजो यांनी मराठीविषयी कृतघ्नता व्यक्त करण्याऐवजी ते विरोधात बोलतात. हे आंदोलन राज्यभर नेण्यात येईल.

रमेश नाईक यांनी म्हणाले, एकही कोकणी वर्तमानपत्र टिकवू शकले नाहीत, याचा पहिला विचार करा. मावजो यांसरख्या प्रवृत्तीला मातीत गाडले पाहिजे.भाई मोये म्हणाले की, कोकणी प्रेमींना प्रसिद्धी ही मराठी वृत्तपत्रांमुळे मिळते. पत्रकार नारायण राटवड म्हणाले की, कोकणीला राजभाषा मिळवून फक्त हातावर मोजण्यासारखे चार-पाच लोकांना याचा फायदा मिळवला आहे.

मावजोंची कीव वाटते!

गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत म्हणाले की, सर्व भारतीय भाषांच्या वतीने मी मावजो यांचा निषेध करतो. मराठी बोलू शकता, लिहू शकता, पण राजभाषा कायद्यातून काढून टाका, अशी मागणी करणे म्हणजे मराठी आई म्हणून मान्य आहे. पण तिला कायद्यातून काढा म्हणणे यावरून मावजोंची कीव करावी वाटते.

‘गोसासे’ कडून मावजोंचा निषेध

मराठीला राजभाषा कायद्यात जे स्थान मिळाले आहे, ती कोणा कोकणीवाद्याची कृपा नाही, त्यासाठी मोठे आंदोलन उभारले गेले होते. अर्थात मराठीप्रेमीची राजभाषेची मागणी पूर्ण झाली नसली तरी या आंदोलनाचा परिणाम म्हणून मराठीला कोंकणीबरोबर समान दर्जा मिळालेला आहे. मराठीप्रेमींचा तो हक्क आहे. त्यामुळे मावजो यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि मराठीचे गोव्यातील स्थान मान्य करावे, अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी केली आहे.

काणकोणातील मराठीप्रेमींकडून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा आहे आज सुमारे सत्तर टक्के हौशी रंगभूमीवर मराठी नाटकांचे सादरीकरण करण्यात येते. देवालयात कीर्तन व भजने मराठीतच होतात याचा विसर मावजो यांना झाला असावा, असे मराठीप्रेमी माजी मुख्याध्यापक शांताजी नाईक गावकर व माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT