Goa Language Dispute Dainik Gomantak
गोवा

"पोर्तुगीजांच्या राजवटीतही जीने आपली संस्कृती, अस्मिता टिकवली, ती मराठी गोव्याची खरी राजभाषा"! फळदेसाईंचे प्रतिपादन

Goa Language Dispute: शिरोडा पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतही ज्या मराठीने आपली संस्कृती आणि अस्मिता टिकवून ठेवली, तीच मराठी गोव्याची खरी राजभाषा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

शिरोडा पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतही ज्या मराठीने आपली संस्कृती आणि अस्मिता टिकवून ठेवली, तीच मराठी गोव्याची खरी राजभाषा आहे. आता या मायमराठीला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी युवा पिढीने ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राज्य युवा शक्ती समन्वयक नितीन फळदेसाई यांनी केले.

शिरोडा येथील मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे युवा शक्ती मेळाव्यांच्या मालिकेचा शुभारंभ आज शिरोडा प्रखंडातून उत्साहात करण्यात आला. या मेळाव्याच्या समारोप प्रसंगी फळदेसाई बोलत होते. नितीन फळदेसाई म्हणाले की, मराठीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे.

कठीण काळातही गोव्याची भाषा मराठी असल्याचे तत्कालीन राज्यकर्त्यांना मान्य करावे लागले होते. ही सशक्त भाषा गोव्याची राजभाषा व्हावी, ही काळाची गरज असून युवकांनी या मोहिमेचे नेतृत्व करावे. राज्य युवा शक्ती प्रमुख विनायक च्यारी, दक्षिण गोवा प्रभारी राजेंद्र वेलिंगकर, भारतमाता की जय संघचालक गोविंद देव, स्थानिक युवा शक्ती प्रमुख तसेच शिरोडा प्रखंड प्रमुख रुपेश नाईक उपस्थित होते.

राजेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले, की मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय आता ही चळवळ थांबणार नाही. यावेळी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्वाक्षरी अभियानाची’ सविस्तर माहिती देण्यात आली. संपूर्ण गोव्यातून ५ लाख सह्या गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला असून, शिरोडा प्रखंडातून यात मोठे योगदान देण्याचे ठरले.

विनायक च्यारी यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचे महत्त्व विषद केले.कार्यक्रमात शरण्य शिरोडकर यांनी ‘मराठी राजभाषा’ व्हावी, असा ठराव मांडला, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, तर शेवटी सर्व उपस्थितांना मराठी राजभाषेची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. सूत्रसंचालन प्रकाश नाईक यांनी केले, तर सामूहिक पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT