Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: गोव्यातील मराठीप्रेमींचा आवाज बुलंद होणार! राजभाषेच्या प्रसारासाठी साठी एप्रिलमध्ये 4 मेळावे, 18 प्रखंडांची स्थापना

Subhash Velingkar: प्रखंडांची रचना भौगोलिक जवळीक लक्षात घेऊन केली जाणार असून, प्रत्येक प्रभागामध्ये जनजागृती मोहिमा राबवली जातील, असेही वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

Sameer Panditrao

Marathi language committee Goa

पणजी: गोवा मराठी राजभाषा निर्धार समितीच्या सुकाणू समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत राज्यभर मराठी राजभाषेच्या प्रचार व प्रसारासाठी १८ प्रखंडांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी एप्रिल महिन्यात चार प्रखंडांमध्ये मेळावे होणार असल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीत प्रारंभी प्रत्येक तालुक्यानुसार १२ समित्या स्थापण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, काही तालुके मोठे असल्यामुळे त्याचे दोन भाग करून एकूण १८ प्रखंड करण्याचा निर्णय बैठकीत अंतिम करण्यात आला. या प्रखंडांची रचना भौगोलिक जवळीक लक्षात घेऊन केली जाणार असून, प्रत्येक प्रभागामध्ये जनजागृती मोहिमा राबवली जातील, असेही वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक प्रखंडात मेळावे घेण्याची कार्ययोजना तयार करण्यात आली असून, एप्रिल महिन्यात चार प्रखंडांमध्ये हे मेळावे पार पडणार आहेत. उर्वरित मेळाव्यांच्या तारखा पुढील आठवड्यात निश्चित करून जाहीर केल्या जातील. या मेळाव्यांतून मराठी राजभाषा चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रा. वेलिंगकर म्हणाले. प्रत्येक प्रखंडात आमची संघटना सक्रीय असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठबळावर हे मेळावे यशस्वी होणार आहेत. गेली चार दशके मराठीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच या चळवळीत नव्याने तरुण, महिला व विविध क्षेत्रांतील मराठीप्रेमी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यांना १०० पेक्षा अधिक लोकांचा प्रतिसाद मिळेल, याची खात्री आहे.

सरकारशी थेट संपर्क!

सुकाणू समितीच्या बैठकीत पुढील टप्प्यात सरकारशी थेट संपर्क साधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपालांच्या भेटी घेऊन त्यांना मराठी राजभाषेच्या संदर्भातील निवेदन सादर करण्यात येणार आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचीही भेट घेऊन राजभाषा धोरणात मराठीला स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न केले जातील, असे वेलिंगकर यांनी सांगितले.

आवाज बुलंद करणार!

राज्यभर मराठीसाठी उभ्या राहिलेल्या या चळवळीला अधिक व्यापक आणि सशक्त बनवण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली आहे. मराठी भाषेप्रती असलेली बांधिलकी आणि आत्मभान या चळवळीच्या केंद्रस्थानी असून येत्या काळात गोव्यातील मराठीप्रेमींचा आवाज अधिक बुलंद होणार हे निश्चित वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT