Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीत गोव्याची नाळ संस्कृतीशी जोडून ठेवणे मराठीमुळेच शक्य झाले, वेलिंगकरांचा दावा

Subhash Velingkar: मराठी राजभाषा निर्धार समितीचा वक्ता-प्रशिक्षण वर्ग , फोमेंतो सभागृह, श्री सरस्वती मंदिर, पणजी येथे, प्राचार्य गजानन मांद्रेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज यशस्वीरित्या पार पडला.

Sameer Panditrao

पणजी: मराठी हा केवळ एका भाषेचा विषय नसून मराठीमुळेच पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीच्या ४५० वर्षात गोव्याची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवणे आपल्याला शक्य झाले. त्यामुळेच संस्कृतीरक्षणासाठीच मराठी राजभाषा होणे गरजेचे आहे, असे उद्गार निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी काढले.

मराठी राजभाषा निर्धार समितीचा वक्ता-प्रशिक्षण वर्ग , फोमेंतो सभागृह, श्री सरस्वती मंदिर, पणजी येथे, प्राचार्य गजानन मांद्रेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज यशस्वीरित्या पार पडला. ते वर्गाच्या समारोपावेळी बोलत होते. या वर्गात गोव्यातील १८ प्रखंडातील ८१ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी पणजी प्रखंडप्रमुख व माजी महापौर अशोक नाईक, प्राचार्य गजानन मांद्रेकर, राज्य समन्वयक रामदास सावईवेरेकर, जिल्हा युवाप्रमुख प्रणव बाणावलीकर, मध्य गोवा युवाप्रमुख शिवाजी वझरकर उपस्थित होते.

ग्रामपंचायत स्तरावर मराठी निर्धार समित्या स्थापन करण्याची मोहीम सुरू झालेली असून, गोव्यात सर्व प्रखंडात या स्तरावर मराठी राजभाषेच्या संदर्भात जागृती करण्यासाठी या प्रशिक्षित कार्यकर्त्यांना गुंतवण्यात येणार आहे.

प्रारंभी राज्य समन्वयक संतोष धारगळकर यांनी स्वागत, परिचय व प्रास्ताविक केले व प्रशिक्षण प्रक्रियेची सूत्रे संयोजक प्रा.गजानन मांद्रेकर यांच्याकडे सोपवली. मातृशक्ती प्रमुख ॲड. रोशन सामंत यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'आनंदाचा क्षण दुःखात बदलला'! विराट कोहलीची X पोस्ट; दुर्दैवी घटनेबद्दल केला शोक व्यक्त

Panaji: चारवेळा ओके म्हणाला, पाचव्यांदा नाही मिळाला रिस्पॉन्स; कॅसिनो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या डायव्हरचा मृत्यू

Vasco: रस्त्यांवर जुनी वाहने, विक्रेते; 'वास्को'तील अतिक्रमणे हटणार कधी? नागरिकांचा संतप्त सवाल

Rivona: 2 भावांचा दुर्दैवी मृत्यू! 'ते' कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडू नये याची काळजी घ्या; आमदार सिल्वांची मागणी

Goa Live Updates: दुहेरी ट्रॅकिंगच्या मुद्द्यावर ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला काँग्रेसचा निषेध

SCROLL FOR NEXT