भारताला झटका, पाकिस्तानला लॉटरी! इराण युद्धाच्या भडक्यात पुतिन यांचा 'डबल गेम'; पाकड्यांना दिली स्वस्त तेलाची बंपर ऑफर

Russia Offers Discounted Oil To Pakistan: आखाती देशांमध्ये इराण युद्धाचा भडका उडालेला असतानाच रशियाने दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणात एक मोठी चाल खेळली.
Russia Offers Discounted Oil To Pakistan
Russia Pakistan Oil OfferDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Russia Offers Discounted Oil To Pakistan: आखाती देशांमध्ये इराण युद्धाचा भडका उडालेला असतानाच रशियाने दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणात एक मोठी चाल खेळली. रशियाने पाकिस्तानला सवलतीच्या दरात कच्चे तेल देण्याची अधिकृत ऑफर दिली. पाकिस्तानातील रशियाचे राजदूत अल्बर्ट खोरेव यांनी इस्लामाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, जर पाकिस्तानने रशियाशी औपचारिक संपर्क साधला, तर मॉस्को त्यांना सवलतीच्या दरात तेल देईल.

इराणने 'होर्मुजची सामुद्रधुनी' बंद केल्यामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले असताना रशियाने स्वतःहून दिलेली ही ऑफर जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, रशियाचा (Russia) हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा भारताला मिळणाऱ्या रशियन तेलातील सवलत जवळपास संपुष्टात आली आहे.

Russia Offers Discounted Oil To Pakistan
Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

रशियन राजदूत अल्बर्ट खोरेव यांनी सांगितले की, ऊर्जा क्षेत्र हे रशिया आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय सहकार्याचा सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे. मात्र, या संदर्भात कोणतेही पाऊल हे इस्लामाबादकडून सुरु होणाऱ्या चर्चेवर अवलंबून असेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे हे पाऊल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, कारण पाकिस्तान हा ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकन गटाचा मानला जातो.

दुसरीकडे, भारताचे रशियाशी जुने आणि घनिष्ठ संबंध असूनही, अलीकडच्या काळात रशियाने भारताला कच्च्या तेलावर मिळणारी सवलत कमी केली आहे. 2022 ते 2025 या काळात भारताला रशियन तेलावर मोठी सवलत मिळत होती, मात्र आता भारताला प्रति बॅरल 98 ते 100 डॉलर्स इतकी मोठी किंमत मोजावी लागत आहे, ज्याचा थेट परिणाम भारताच्या आयात खर्चावर होत आहे.

Russia Offers Discounted Oil To Pakistan
VIDEO: आधी दहशवादानं नाव खराब केलं, आता 'अडाणीपणानं' देशाचं हसू झालं, अमेरिकेत शाहबाज शरीफ क्लीन बोल्ड; तुम्हीच बघा नेमकं काय झालं?

पाकिस्तान (Pakistan) सध्या वाढत्या इंधन दरामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. इराणमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अशा स्थितीत रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल पाकिस्तानसाठी मोठा आधार ठरु शकते. मात्र, रशियाने ही ऑफर देताना अमेरिकेवरही जोरदार निशाणा साधला. राजदूत खोरेव यांनी इराणमधील संघर्षासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार धरले.

अमेरिकेच्या लष्करी कारवायांमुळे जगभरात तणाव निर्माण झाला असून हा संघर्ष कधी संपेल हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेला हल्ला निषेधार्ह असून या भागात त्वरित शांतता प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचे रशियाने म्हटले.

Russia Offers Discounted Oil To Pakistan
India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

रशियाने अमेरिका आणि इस्रायलच्या कारवायांवर टीका करताना म्हटले की, इराणचे नेतृत्व कमकुवत करण्याचा हा एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. रशियाने सर्व देशांना संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार राजनैतिक माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. रशियाने एका बाजूला भारताची सवलत कमी करुन पाकिस्तानला दिलेली ही ऑफर दक्षिण आशियातील शक्ती संतुलनात बदल करण्याचे संकेत देत आहे. आता पाकिस्तान रशियाच्या या प्रस्तावाचा स्वीकार करुन अमेरिकेची नाराजी ओढवून घेणार की आपल्या देशातील ऊर्जा संकट सोडवण्यासाठी पुतिन यांच्याशी हातमिळवणी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

donald trump mojtaba khamenei
Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
America Strikes Iranian Oil Tankers:
Ishaq Dar Claim Iran Supported Pakistan Operation Sindoor
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com