Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Marathi Breaking News: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

मंत्री गोविंद गावडेंना अखेर हटवले!

वादग्रस्त कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून अखेर डच्चू.

60 लाखाची दारू असल्याचा अंदाज व्यक्त

धारगळ येथे दारूच्या कंटेनरला आग लागून 30 तास उलटले तरीही अबकारी विभागाकडे दारूची मोजमाप अजूनपर्यंत होईना, 60 लाखाची दारू असल्याचा अंदाज व्यक्त,आज सायंकाळी पेडणे पोलिसांनी दारू अबकारी विभागाच्या हवाली केली.

पोर्तुगीजकालीन मधलावाडा बोळकर्णे पूल बांधण्याचे काम सुरु

पोर्तुगीजकालीन असलेला मधलावाडा बोळकर्णे पूल नवीन बांधावा अशी सतत मागणी लोकांची होती.त्यानुसार भाजप सरकारने याची दखल घेऊन नवीन पूल बांधण्यासाठी काम चालू केले आहे.

जुन्ता हाऊसबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

नयना आडारकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

कोकणीच्या प्रसिद्ध लेखिका, साहित्यिक नयना आडारकर यांना २०२५ सालचा बाल साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. 'बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो' या पुस्तकाला पुरस्कार.

"गोवेकरांनी गोव्याचं अस्तित्व आणि हक्क मिळवण्यासाठी काम केलं पाहिजे" मनोज परब

प्रत्येक गोवेकरांनी गोव्याचं अस्तित्व आणि हक्क मिळवण्यासाठी काम केलं पाहिजे. रेवोल्युशनरी गोवन पार्टी गोवेकरांच्या हितासाठी काम करते. त्यात गोवेकरांनी सहभाग घेतला पाहिजे गोव्याचं अस्तित्व राखून ठेवलं तरच गोवा टिकणार : मनोज परब

एखाद्याला ‘गावडे’ म्हणणे जातीवाचक टिप्पणी नाही; मंजिरी धारगळकर व पीआय देवयानी नाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

एखाद्याला ‘गावडे’ असे संबोधणे ही जातीवाचक टिप्पणी ठरत नाही, कारण ‘गावडे’ हे आडनाव आहे, असे निरीक्षण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले. हे निरीक्षण उच्च न्यायालयाने मान्य करून राज्य सरकारने मंजिरी धारगळकर व पोलीस निरीक्षक देवयानी नाईक यांच्या विरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली.

काणकोण नगरपालिकेतील देवबाग अडपे येथील श्री महादेवाच्या जुन्या मंदिराचा सेल्प कोसळाला

सतत पडणाऱ्या पाऊसामुळे काणकोण नगरपालिकेतील देवबाग अडपे येथील श्री महादेवच्या जुन्या मंदिराचा सेल्प कोसळला असून त्यात महादेवाचे लिंग नंदी व गणपती हे दैवत मंदिराच्या स्लॅब खाली आले आहे. हे मंदिर एकांत स्थळे व वस्ती पासून दूर असल्यामुळे लोकांना या घटनेची माहिती नव्हती.

समिक्षा नाईकच्या घराची दुरुस्ती,गोमन्तक टीव्हीने जपला सामाजीक वसा

वाजे -शिरोडा येथील समीक्षा नाईक यांच्या मोडकळीस आलेल्या घराची समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकर यांनी करून दिली दुरुस्ती. गोमंतक टीव्हीने सामाजीक वसा जपत केलेल्या वृत्ताची अनेकांकडून दखल.

"माणसाने लोभी नसावे किंवा नेहमीच जास्त मागू नये" रोहिदास रघुनाथ देसाई

माणसाने लोभी नसावे किंवा नेहमीच जास्त मागू नये.आपण इतरांचाही विचार केला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांनी जास्त गरजूंसाठी आपल्या नोकऱ्या देण्यास तयार असले पाहिजे. स्वातंत्र्यसैनिक असणे हेच सर्वस्व नाही असे स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास रघुनाथ देसाई म्हणाले.

धारबांदोडा येथील खून प्रकरणी आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

प्रतापनगर- धारबांदोडा येथील खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित संजय केविन एम. (२२) याला सांगे न्यायालयाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी.

क्रांती दिनाच्या शुभेच्छा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT