Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : लिब्रा ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद : देविदास पांगम

Mapusa News : विनामूल्य कायदा सल्ला देणारे राज्यातील एकमेव विश्‍वस्त मंडळ

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा लोकांना विनामूल्य कायदा सल्ला देणारा राज्यातील एकमेव लिब्रा सोशिओ लीगल ट्रस्ट म्हापशात कार्यरत आहे. अॅड. सिद्धी पारोडकर, शिरीष दिवकर आणि त्यांच्या सहकारी यासाठी कौतुकास पात्र आहेत.

गरजवंतांनी या विश्वस्त मंडळातील वकिलांचा सल्ला घेऊन आपल्या समस्या सोडवाव्यात असे आव्हान राज्याचे अॅड. जनरल देविदास पांगम यांनी केले.

दत्तवाडी येथील इंद्रधनुष्य सभागृहात लिब्रा सोशिओ लीगल ट्रस्टच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पांगम प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा प्रशासकीय न्यायालयाचे माजी अध्यक्ष अॅड. राजेश नार्वेकर, ट्रस्टच्या अध्यक्ष अॅड. सिद्धी पारोडकर, सचिव अॅड. वल्लभ पांगम व प्रमुख संस्थापक शिरीष दिवकर उपस्थित होते.

या सोहळ्यात अॅड. राजेश नार्वेकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना अॅड. नार्वेकर म्हणाले की, सत्कार कर्तृत्वाचा, कर्तबगराचा व्हावा. राज्य पुरस्कारापेक्षा घरचा हा सत्कार महत्त्वाचा वाटतो.

याच कार्यक्रमाचा संस्थेसाठी अविरतपणे काम करणारे शिरीष दिवकर, अॅड. सिद्धी पारोडकर, अॅड. सोमनाथ कर्पे, अॅड. वल्लभ पांगम, अॅड. परी काटकर, अॅड. प्रणिता कर्पे व अॅड. आनंद शिरोडकर यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिरीष व पद्मजा दिवकर यांनी आपले कार्यालय ट्रस्टसाठी दिल्याचे घोषित केले.

घटनेत सेक्युलर, निधर्मी शब्द नव्हता!

पांगम यांनी यावेळी भारतीय घटनेची निर्मिती कशी झाली याची सविस्तर माहिती दिली. अनेक विद्वानांनी यासाठी योगदान दिले. अमेरिका ऑस्ट्रेलिया, कॅनडा व इतर देशांच्या घटनांचा अभ्यास करून मसुदा तयार केला ब्रिटिशांनी इंडिया ॲक्ट १९३५ आणलेल्या कायद्यात मूलाधार आहे.

सेक्युलर, निधर्मी हा शब्द त्यात नव्हता, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यास विरोध होता असे ते म्हणाले. मूलभूत हक्क आणि आपले कर्तव्य वेगळे करून चालणार नाही. दोन्ही समान आहेत याचे स्मरण करून दिले, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuncolim: सफर गोव्याची! गोवा मुक्ती लढ्याची‌ ठिणगी पडलेले, 12 बांधाच्या पाण्याने समृद्ध असलेले 'कुंकळ्ळी'

T20 World Cup 2026: बीसीसीआयचा 'स्ट्रिक्ट' मोड! मिशन वर्ल्ड कपसाठी 'होम मिनिस्टर'ची साथ सुटली; नियमावर बोट ठेवत खेळाडूंना ठणकावलं

Grah Gochar 2026: 120 वर्षांनंतर घडणार मोठा चमत्कार! शुक्र-सूर्य-शनीच्या त्रिनेत्र युतीनं 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Bison In Goa: ब्रह्मकरमळीत गवा रेड्यांचा धुमाकूळ; दगडी कुंपण तोडून कळपाचा शिरकाव; शेतकरी चिंतेत

Salman Khan: "सलमान आणि मी एकत्र नग्न होऊन आंघोळ केलीय पण...", भाईजानच्या खास फ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT