Goa Today's News: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

Goa Live News Update Breakings In Marathi: क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रात दिवसभरात गोव्यात घडणाऱ्या ठळक घडमोडींचा आढावा.
Goa Live News Update Breakings In Marathi |Goa CM Pramod Sawant
Goa Live News Update Breakings In Marathi |Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

महिला फुटबॉल खेळाडू विनयभंग प्रकरणी दीपक शर्मा यांना अटक

दोघा महिला फुटबॉल खेळाडूंचा विनयभंग करुन त्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे कार्यकारी समिती सदस्य दीपक शर्मा (हिमाचल प्रदेश) यांना केली अटक.

मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केले केळबाई देवीचे कळस पूजन

हरवळे, साखळी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील केळबाई देवीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिगमोत्सवानिमित्त सपत्नीक कळस पूजन केले. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांच्या शांती, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली.

सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण, आप नेते राहुल म्हांबरे यांची निर्दोष मुक्त

गोवा विधानसभा निवडणुकीच्या काळात करासवाडा येथे आपचे पोस्टर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी राहुल म्हांबरे यांच्या विरोधात म्हापसा पोलिसांनी 16 डिसेंबर 2022 रोजी ‘पीडीपीपी कायदा कलम 3’ अंतर्गत राहुल म्हांबरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.

याप्रकरणी आता राहुल म्हांबरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Goa AAP
Goa AAPDainik Gomantak

डिचोलीत झांट्ये कॉलेज आणि विशेष शाळेजवळ आग

Bicholim Fire Case

डिचोलीत झांट्ये कॉलेज आणि विशेष शाळेजवळ भर दुपारी आग. अग्निशमन दलाने वेळीच मदतकार्य केल्याने अनर्थ टळला.

Goa Fire
Goa FireDainik Gomantak

सांतिनेजमधील 'हा' मार्ग 30 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद

सांतिनेज येथील झाकिस बिर्याणी जवळील स्टर्लिंग अपार्टमेंट ते PWD कार्यालयापर्यंतचा मार्ग 30 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद. स्मार्ट सिटीच्या रस्ते सुधारणा उपक्रमांचा एक भाग म्हणून 150 मीटर मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.

Road Closed
Road Closeddainik gomantak

17 लाखांच्या खंडणी प्रकरणात म्हापसा पोलिसांकडून दोघांना अटक 

Mapusa Police

म्हापसा पोलिसांकडून ऑगस्ट 2023 मधील 17 लाखांच्या खंडणी प्रकरणात दोघांना अटक. पोलिस अधिकारी असल्याचे भासवत म्हापसा येथील हॉटेलमधील खोट्या अमली पदार्थाच्या छाप्यात अडकविण्यात आले होते. तक्रारदार आणि संशयित दोघेही बिगर गोमन्तकीय असून, अधिक तपास सुरु.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकणी कर्नाटकच्या एकाला अटक

Vasco Police

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सुयश अंबरनाथ (19, कर्नाटक) याला वास्को पोलिसांकडून अटक. त्याच्याकडून एक लाख किंमतीचा एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

Vasco Police
Vasco PoliceDainik Gomatak

दोन दिवसांत निर्णय, मला तिकीट दिल्यास हमखास विजय - फ्रान्सिस सार्दिन

Goa Congress Loksabha Ticket

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारीबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. दक्षिणेतून मला तिकीट दिल्यास हमखास विजय होईल, असा विश्वास विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com