Mapusa Waste Problem Dainik Gomantak
गोवा

Mapusa Garbage Issue: चतुर्थी तोंडावर पण सर्व प्रभागात कचऱ्याच्या राशी; म्हापशात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Mapusa Waste Issue: म्हापसा पालिका क्षेत्रातील वीसही प्रभागात कचऱ्याच्या राशी पडलेल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Garbage Problem

बार्देश: म्हापसा शहरातील काही भागांत सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहेत. एकतानगर हाऊसिंग बोर्ड, सिम खोर्ली येथील राष्ट्रोळी देवस्थान जवळ, त्याचप्रमाणे डांगी कॉलनी, धुळेर, करासवाडा, गणेशपुरी, मरड, म्हापसा मार्केट तसेच म्हापसा पालिका क्षेत्रातील वीसही प्रभागात कचऱ्याच्या राशी पडलेल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासूनची ही स्थिती आहे तशीच आहे. कचऱ्याची वेळेवर उचल होत नसल्याने कचरा साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यासंदर्भात, माजी नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर म्हणाल्या की, कचरा उचलण्यासाठी पालिकेजवळ जी वाहने आहेत त्यातील काही वाहने ही मोडकळीस आलेली आहेत. त्यामुळे वाहनांची कमतरता भासत असून याकडे पालिकेने लक्ष द्यायला हवे. युथ संस्थेचे अध्यक्ष प्रवीण आसोलकर यांनी सांगितले की, शहरातील कचऱ्याची उचल गणेश चतुर्थीपूर्वी करावी. या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरत असून आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

कामगारांची संख्या २५९; मग स्वच्छता का नाही

म्हापसा पालिकेकडे सध्या कचरा उचलणाऱ्या कामगारांची संख्या एकूण २५९ एवढी आहे. यातील ८० कामगार हे कायमस्वरुपी तर हंगामी कामगारांची संख्या १७९ एवढी आहे. आम्ही सर्व कामगारांना कचरा उचलण्याबाबत वारंवार सूचना केलेल्या आहेत. सुपरवाझरनाही याबाबत सांगितले आहे. तरीही तक्रारी वाढत असतील तर यासंदर्भात कडक भूमिका घ्यावी लागेल, असे नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

VIDEO: "रस्ता नाही, तर मतदान नाही"! गोव्यातील 'या' गावच्या ग्रामस्थांचा इशारा; निवडणुकांवर बहिष्‍कार टाकण्‍याचा निर्धार

Goa Crime: म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश! 1 कोटी 27 लाखांची फसवणूक उघड; दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT