Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Mapusa Traffic Chaos: म्हापसा शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

बार्देश: म्हापसा शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ‘म्हापसा बझार’समोरील मुख्य रस्त्यावर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे ग्राहक, पादचारी तसेच वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला फळविक्रेते, तर दुसऱ्या बाजूला कपडे विक्रेते रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात साहित्‍य मांडून व्यवसाय करत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ताच गायब झाला आहे.

अनेक विक्रेते आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यावरच दिवसभर उभ्या करून ठेवत असल्याने वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर बनत आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना या मार्गावरून चालताना तसेच वाहन घेऊन जाताना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक संथ होत असून, किरकोळ कोंडीचे रूपांतर मोठ्या समस्येत होत आहे.

म्हापसा बाजारपेठ ही उत्तर गोव्‍यातील प्रमुख खरेदी केंद्र असल्याने येथे दिवसभर नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्याचा काही भाग विक्रीसाठी आणि उर्वरित जागा पार्किंगसाठी वापरली जात असल्याने वाहतुकीसाठीची जागा अधिकच कमी होत चालली आहे.

याचा सर्वाधिक फटका पादचाऱ्यांना बसत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना माल मांडलेला असल्याने नागरिकांना अनेकदा वाहनांच्या मार्गातूनच चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना विशेष काळजी घेत मार्ग काढावा लागत आहे.

बाजारपेठेत चारचाकी वाहने थेट आणण्याचे प्रमाणही मोठे आहे. खरेदीसाठी आलेले काही नागरिक वाहने रस्त्यावरच थांबवून ठेवत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. बाजारातील अरुंद रस्ते आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता चारचाकी वाहनांच्या प्रवेशाबाबत योग्य नियोजन करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणीही पुढे आली आहे. केवळ अधूनमधून कारवाई न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विक्रेते, व्यापारी, ग्राहक, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे.

‘कारवाईपेक्षा हवा कायमस्वरूपी उपाय’

युवा समाजकार्यकर्ते सितेश मोरे यांनी विक्रेत्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून देतानाच रस्त्यावर माल मांडण्यास मर्यादा घालण्याची मागणी केली आहे. दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग आणि चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त करून कारवाईपेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT