Public awareness about uterine cancer Dainik Gomantak
गोवा

Mapusa Cancer Awareness : ‘कर्करोग मुक्त भारता’चा आमचा मनोदय - सीमा सिंग

सीमा सिंग : मेघाश्रय संस्थेतर्फे म्हापशात जनजागृती

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Cancer Awareness: महिलांमध्ये उद्भवणारा स्तन कर्करोगासारखाच गर्भाशयाचा कर्करोग हा जीवघेणा रोग देशात पसरू लागला आहे. या घातक रोगाची माहिती महिलांना  देणे आमचे आद्यकर्तव्य आहे.

म्हणूनच मेघाश्रय या संघटनेच्या माध्यमातून भारतभर भ्रमंती करून महिलांना जागृत करून गर्भाशय कर्करोग मुक्त भारत करण्याचा आमचा मनोदय आहे, अशी माहिती मेघाश्रय संस्थेच्या प्रवर्तक सीमा सिंग यांनी दिली.

म्हापसा येथे आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आयोजक सुभाष केरकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर व नगरसेविका अन्वी कोरगावकर उपस्थित होत्या.

सीमा सिंग म्हणाल्या की, पंधरा वर्षांवरील मुली तसेच स्त्रियांना या दुर्धर रोगाची लागण होऊ शकते. कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून मासिक पाळीच्या वेळी महिलांनी काळजी घ्यायला हवी, स्वच्छ रहावे.

नगरसेविका अन्वी कोरगावकर व सुधीर कांदोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीला स्वागत व प्रास्ताविक सुभाष केरकर यांनी केले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय सिद्धेश धावसकर यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन व आभार मिलन वांगणकर यांनी मानले.

प्रतिबंधात्मक लस निर्मितीचे काम सुरू

गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लसची निर्मिती चालू असून सरकारकडून त्यास मान्यता मिळायची आम्ही वाट पाहात आहोत. महिला सशक्त व सक्षम असाव्यात आत्मनिर्भर असाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

प्रत्येक घराघरांत आणि गावागावांत या विषयावर चर्चा होऊन जनजागृती व्हावी यासाठी आम्ही धडपडत आहोत. तज्ज्ञ डॉक्टरांसोबत पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटीस येऊ, असे सीमा सिंग म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT