Mapusa News: गॅरेज कॉम्प्लेक्स ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार- उपसभापती

गोवा राज्य नागरी विकास एजन्सीकडून गॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे.
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा येथील नगरपालिकेच्या गॅरेज जागेवर येणाऱ्या व्यावसायिक कॉम्प्लेक्स प्रकल्पाचे काम मागील तीन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. हा प्रकल्प मार्च 2023 मध्ये पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, आता प्रकल्पाचे लोकार्पण होण्यास ऑक्टोबर 2023 ही नवीन तारीख देण्यात आली आहे.

शनिवारी (ता.15) उपसभापती तथा म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, शुभांगी वायंगणकर, डॉ. नूतन बिचोलकर, पालिका अभियंता व पदाधिकाऱ्यांसोबत गॅरेज तसेच जुन्या पालिका इमारतीची पाहणी केली. या जुन्या पालिका इमारतीत ग्रंथालय सुरू केले जाणार आहे.

Mapusa News
Goa News: खवय्यांसाठी थोडी खुशी थोडा गम, ‘मानकुराद’ चा दर घटला मात्र मासे महाग

दरम्यान, गोवा राज्य नागरी विकास एजन्सीकडून गॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे. मध्यंतरी, कोविडमुळे कामाला विलंब झाल्याचे उपसभापती म्हणाले.

पार्किंगसाठी तळघर

गॅरेज प्रकल्पाच्या या प्रस्तावित सहा मजली इमारतीत पार्किंगसाठी तळघराची तरतूद केली आहे. व्यावसायिक इमारतीत तळमजल्यावर सुमारे सात व पहिल्या मजल्यावर सुमारे 14 दुकाने असतील. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कार्यालये असतील.

Mapusa News
Sudin Dhavalikar: चार वर्षांत मडकईचे रूप पालटणार- ढवळीकर

कोविडमुळे गॅरेज प्रकल्पाचे काम बरेच रेंगाळले. येत्या ऑक्टोबर 2023 पर्यंत गॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे पालिकेला चांगला महसूल प्राप्त होईल.

सध्या जुन्या पालिका इमारतीच्या जीर्णोद्धाराचे काम तेजीत सुरू असून, तिथे ग्रंथालय सुरू केले जाणार आहे. जानेवारी 2024 पर्यंत या ग्रंथालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

- जोशुआ डिसोझा, उपसभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com