Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : दैव बलवत्तर! माय-लेक बचावले; मालवाहू ट्रकला कारची मागून धडक

Mapusa News : जीए ०५ टी ६१४२ क्रमांकाचा मालवाहू ट्रक गिरी ते करासवाड्याच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. तर त्याच दिशेने मागून जीए ०३ एएफ ४२८८ क्रमांकाची मारुती एसप्रेसो ही कार चालली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : म्हापसा, कामरखाजन-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या मालवाहू ट्रकला मागून कारने धडक दिली. या अपघातात कारमधील माय-लेक किरकोळ जखमी झाली.

हा अपघात सोमवारी (ता.११) दुपारी २ वा.च्या सुमारास घडला. या अपघातात सुकूर येथील कारचालक केतकी रूपेश गडेकर व त्यांची मुलगी ध्रुवी (७) ही किरकोळ जखमी झाली. म्हापशातील खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

जीए ०५ टी ६१४२ क्रमांकाचा मालवाहू ट्रक गिरी ते करासवाड्याच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. तर त्याच दिशेने मागून जीए ०३ एएफ ४२८८ क्रमांकाची मारुती एसप्रेसो ही कार चालली होती.

घटनास्थळी ट्रकचालक संग्राम हलेमनी (काले-सांगे) याने गती कमी करत ट्रक रस्त्याच्या बाजूने घेतला. याचवेळी मागून आलेल्या कारने ट्रकला धडक दिली आणि कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.

ट्रकला धडक बसताच कारमधील एअर बलून फुटले आणि त्यामुळे कारचालक महिला व तिची लहान मुलगी किरकोळ जखमी होऊन बचावली. अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या वाहनस्वारांनी गाड्या थांबवत कारमध्ये अडकलेल्या माय-लेकीला बाहेर काढले व त्यांना रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल केले.

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोडी झाली. वाहतूक पोलिस निरीक्षक मार्लन डिसोझा व त्यांचे सहकारी पोलिस तसेच रॉबर्ट जीपवरील पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलिस हवालदार उल्हास गावकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: सावधान! प्रेम जीवनात मोठे संकट! वृषभ-मकरसह 'या' 4 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Goa Pollution: नरकासुराच्या नावावर पणजीत धुमाकूळ, वाहनचालकांची धूम; ध्वनी प्रदूषणामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Porvorim Flyover Meeting: परवरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचो घेतलो नियाळ - रोहन खंवटे

IND vs AUS 2nd ODI: रोहित, कोहलीकडून 'विराट' खेळीची अपेक्षा! अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारी पाहा

Mhadei River Dispute: जलसंपदा खात्याचा सखोल 'गृहपाठ' सुरू, म्हादईप्रश्‍‍नी शुक्रवारी विशेष बैठक; अहवालासाठी तज्ज्ञांची मदत

SCROLL FOR NEXT