म्हापशाला आदर्श शहर बनवणार : सुधीर कांदोळकर Dainik Gomantak
गोवा

म्हापशाला आदर्श शहर बनवणार : सुधीर कांदोळकर

म्हापशाच्या आमदारपदी निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मी जनहितकारक विकासकामांना चालना देऊन म्हापसा हे गोव्यातील आदर्श शहर बनवणार आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापशाच्या आमदारपदी निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मी जनहितकारक विकासकामांना चालना देऊन म्हापसा हे गोव्यातील आदर्श शहर बनवणार आहे. त्यापैकी सर्वप्रथम दीर्घ काळ रखडलेला रवींद्र भवनचा (Ravindra Bhavan building) प्रश्न हाती घेतला जाईल, असे काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी मंगळवारी गोमन्तकशी बोलताना स्पष्ट केले.

विद्यमान भाजप आमदार ज्योशुआ डिसोझा (Joshua D'Souza) यांनी विकासकामांबाबत निष्क्रियता दाखविल्याने मलनिस्सारण प्रकल्प, रवींद्र भवन, तार नदीचे प्रदूषण, भूमिगत वीजवाहिन्या, नवीन बसस्थानक इत्यादींसंदर्भात म्हापसावासीयांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याबाबत काहीच होऊ शकले नाही. स्वत:चे वडील आमदार असताना पायाभरणी झालेल्यापैकी एकही प्रकल्प पूर्णत्वास नेणे त्यांना शक्य झाले नाही. लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याच्या हेतूने भूमिगत वीजवाहिन्या व बसस्थानकाचे काम अंशत: करण्यात आले, असा दावाही कांदोळकर यांनी केला. (Sudhir Kandolkar Latest News Updates)

कांदोळकर यांनी मलनिस्सारण प्रकल्पासंदर्भात सांगितले, की म्हापसा शहर हा सखल भाग असल्याने भूजल पातळी जास्त आहे. त्यामुळे शौचालयांच्या सोक पिटमधील मलमूत्राचा व्यवस्थित निचरा जमिनीत होत नाही. काही जुन्या घरांना जुन्या शैलीचे ‘पिग टॉयलेट’ आहेत व त्यातील मलमूत्र ओहोळांत सोडून दिले जाते. काही ठिकाणी शौचालयांमधील मळ तसेच सांडपाणी सोक पिट तुंबल्याने रस्त्यावर येत असते, जे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. तार नदीच्या प्रदूषणाबाबतही भाजप सरकार तसेच म्हापशातही भाजपचा आमदार असतानाही ठोस उपायोजना राबवली नाही. केवळ दाखवण्यापुरती थोडेफार काम केल्याचे नाटक करण्यात आले.

मलनिस्सारण प्रकल्प सर्वाधिक महत्त्वाचा...

गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी काहीच केले नाही, असा आरोप करून कांदोळकर म्हणाले, की हा प्रकल्प म्हापसावासीयांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा तसेच अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करणे ही काळाची गरज आहे.

क्रीडा मैदाने खुली करणार!

कांदोळकर म्हणाले, म्हापशात सध्या असलेली क्रीडामैदाने विशिष्ट संस्थांच्या ताब्यात असल्याने एकही खुले मैदान म्हापसावासीयांसाठी उपलब्ध नाही. तसेच शहरातील चार हायस्कुलांना स्वत:ची छोटेखानीदेखील मैदाने नाहीत. त्यांच्यासाठी तसेच म्हापशातील लहान मुले व युवकांसाठी काही ठिकाणी खुली मैदाने व बालोद्याने उपलब्ध करण्यास आपण प्राधान्य देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT