Mapusa News Gomantak Digital Team
गोवा

Mapusa News : थिवी रेल्वे स्थानकाबाहेर मुंबईतील पर्यटक व रिक्षाचालकांत हाणामारी

गाडी पार्क करण्यावरून वाद : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

थिवी रेल्वे स्थानकाबाहेर पर्यटक तसेच स्थानिक रिक्षा चालकांमध्ये हाणामारी होणारा एक व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील पर्यटक व रिक्षा चालकांमध्ये ही हाणामारी झाली. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कार क्रमांकावरुन मुंबईतील अनोळखी अर्टिगा कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला. याप्रकरणी रिक्षा चालक नीलेश पार्सेकर हे तक्रारदार आहेत. रेल्वे स्थानकावर एमएच 01 डीटी 6051 क्रमांकाची एक अर्टिगा कार आली असता, कार चालकाने ही गाडी येथील रिक्षा स्टॅण्डवर पार्क केली. त्यावेळी फिर्यादींनी कार चालकाला तिथून गाडी काढण्याची विनंती केली.

यावर या कारचालक व आतील इतरांनी फिर्यादींशी वाद घातला. यावेळी गाडीतील अल्पवयीन मुलावर हात उगारल्याचा दावा करत संशयितांनी फिर्यादीला मारहाण केली व त्यांच्या तोंडावर बुक्का मारत त्यांना खाली पाडले. यात ते गंभीर जखमी झाले. सहकारी रिक्षा चालकाच्या मदतीला आलेल्या मोहन वारखंडकर यांनाही संशयितांनी धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर संशयित कारमधून निघून गेले.

रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद

मारहाणीची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा इस्पितळात दाखल केले. उपचारार्थानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. रिक्षाचालक पार्सेकरच्या तक्रारीवरून कारचालक व इतर अज्ञाताविरोधात मारहाण, धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरीश रेडकर हे तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्यटन हवयं, मृत्यूचा नंगानाच नको! गोव्यातील क्लब, पब्जसाठी ठोस कायद्याची गरज; 'करमणुकीचा कार्यक्रम' ही पळवाट बंद करा- संपादकीय

'इंडिगो'चा अहंकार अन् केंद्राचे लोटांगण! नियम मोडल्याने देशातील लाखो प्रवाशांना 'मनस्ताप'; सरकारवरही ओढावली नामुष्की-संपादकीय

Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

U-11 National Championships: बडोद्यात गोव्याचा डंका! 9 वर्षांच्या अमायरा धुमटकरने राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पटकावले 'ब्राँझपदक'

Cooch Behar Trophy: लाखमोलाची आघाडी! बंगालविरुद्ध अनिर्णित लढत; गोव्याच्या U-19 संघाने पहिल्या डावातील 27 धावांच्या जोरावर गाठली बाद फेरी

SCROLL FOR NEXT