Goa Traffic Rule: वाहनचालकांनो सावधान! ‘स्पीड रडार गन्स’ आजपासून ‘ॲक्टीव्ह’

वेगमर्यादेवर नजर : आणखी 70 ठिकाणी कॅमेरे
 Traffic Rule
Traffic RuleDainik gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Rule रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 जूनपासून भरवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर ‘स्पीड रडार गन्स’द्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. या स्पीड रडार गन्स राज्यात विविध ठिकाणी उभारून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे.

चालकाने वेगमर्यादेचे पालन न केल्यास त्यांना पुराव्यासह घरपोच चलन येणार आहे. शिवाय राज्यात आणखी 70 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज वाहतूक पोलिसांकडे 10 स्पीड रडार गन्स सुपूर्द केल्या. यावेळी मंत्री गुदिन्हो म्हणाले की, या गन्सद्वारे दिवसा सुमारे 200 मीटर अंतरावरील तर रात्रीच्यावेळी 100 मीटर दूरवरील वाहनाची वेगमर्यादा मोजता येते.

 Traffic Rule
Margao Mini-Bus Accident: मिनीबसच्या धडकेत 10 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नुकतेच गुजरातहून गोव्यात आले होते कुटूंब

तसेच त्या वाहनाचा क्रमांकही स्पष्टपणे टिपता येतो. यापूर्वी खात्याने 4 गन्स वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. आज त्यात आणखी 10 गन्सची भर पडली आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे पोलिसांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप बंद होतील व पुराव्यासह चालकांना चलन देणे शक्य होईल.

भाडेपट्टीवर घेतलेल्या दुचाकी वा चारचाकी वाहनचालकाने नियम उल्लंघन केल्यास व ते सीसीटीव्ही तसेच स्पीड रडार गन्सने टिपल्यास त्याचे चलन त्या वाहनाच्या मालकाला पाठवले जाईल, असे ते म्हणाले.

रस्ते अपघात रोखण्यासाठी शिकाऊ किंवा कायमस्वरूपी वाहनचालक परवाना देताना उमेदवाराची परीक्षा अधिक खडतर केली जाणार आहे. हा परवाना यापुढे ऑटोमेटेड वाहन चालवण्याच्या चाचणीनंतर देण्यात येणार आहे.

80 टक्के गुण मिळणाऱ्यांनाच यापुढे शिकाऊ वाहनचालक परवाना मिळेल. कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी वाहन चालवण्याची चाचणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित केली जाणार आहे.

ही चाचणी पूर्णपणे ऑटोमेटेड असल्याने त्यात गैरप्रकाराचा प्रश्‍न येणार नाही. त्यामुळे पूर्ण प्रशिक्षित चालकांनाच रस्त्यावर वाहन चालवण्याचा परवाना मिळेल, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

 Traffic Rule
Sports Authourity of Goa: बेलाबाय-चिरकूनउडी येथे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या जागेत कचरा

जुनी वाहने भंगारात

15 वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत. भंगारासाठी आवश्‍यक सुविधा निर्माण करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्याची सुरुवात सरकारी वाहनांपासून केली जाईल. कदंब महामंडळालाही त्यांची 15 वर्षे जुने झालेली वाहने भंगारात काढण्याचे निर्देश दिले आहेत , अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

70 अल्कोमीटरची खरेदी

मद्यपान करणारे चालकही रस्ते अपघातास जबाबदार आहेत. मद्यपी वाहनचालकांची चाचणी करण्यासाठी वाहतूक खात्याने 70 अल्कोमीटर खरेदी केले असून लवकरच ती वाहतूक पोलिसांकडे सुपूर्द केली जातील. वाहतूक पोलिसांमार्फत अचानक रात्रीच्यावेळी मोहीम आखून मद्यपी चालकांवर कारवाई केली जाईल.

 Traffic Rule
Dovorlim Land Grab: दवर्ली जमीन हडप प्रकरणातील संशयित दोडामणी याला जामीन मंजूर

यावर्षी स्पीड रडार गन्सद्वारे 4,041 वाहनचालकांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली. सध्या वाहतूक पोलिसांकडे 13 स्पीड रडार गन्स आहेत. या नव्या 10 गन्समुळे ही संख्या 23 झाली आहे.

या यंत्रामुळे वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याची शिस्त लागावी, हा उद्देश आहे, महसूल जमा करण्याचा नव्हे. ही यंत्रणा ऑटोमेटेड असल्याने अधिक वाहतूक पोलिसांची गरज भासणार नाही. - धर्मेश आंगले, पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com