mapusa Independence day Dainik Gomantak
गोवा

म्हापसा पोलीसांचा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम

75 वा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसह पार पडला कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

कोलवाळ येथील लीला गार्डन्स येथे आज सकाळी गोवा पोलिसांनी म्हापसा उपविभागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम भारत सरकारने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केले्या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. ( Mapusa Sub- Division Police celebrate 75th Independence Day with Senior Citizens )

याबाबात माहिती देताना म्हापसा पोलिसांनी सांगितले की, लोकांचा इतिहास, संस्कृती यांचे वेगळेपण समोर आणता यावा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याबाबत माहिती देताना म्हापसा पोलीस उपाधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, ज्यांनी भारताची क्षमता ओळखण्यात आणि आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) चे भारत 2.0 चे व्हिजन आणखी मजबूत करण्यात मदत केली. त्या सर्वांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्या सर्वांना अभिवादन या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम केंद्र सरकारने साजरा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहीजे असं म्हटलं आहे. हा कार्यक्रम 12 मार्च 2021 रोजी सुरू झाला आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी संपेल यानिमित्ताने आपण आज ही आयोजन केले होते. ज्याला नागरिकांनी ही चांगला प्रतिसाद दिला आहे. असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धमंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित राहीले. तसेच जसपाल सिंग, आयपीएस पोलीस महासंचालक, गोवा, श्री ओमवीर सिंग, आयजीपी यांच्यासह पोलीस अधीक्षक, उत्तर गोवा - शोभित सक्सेना, एसडीपीओ मापुसा जिवबा दावी यांच्यासह नागरिकांनी ही उपस्थित राहात या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे ही ते म्हणाले.

...तर त्यांना भाजप कार्यालयातून मिळणार मोफत तिरंगा

गोवा: आर्थिक समस्यांमुळे राष्ट्रध्वज विकत घेणे शक्य नाही त्यांनी भाजप कार्यालयातून मोफत तिरंगा घेऊन हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे आवाहन सुभाष फळदेसाई यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना13 ते 14 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून किंवा प्रदर्शित करून 'हर घर तिरंगा' चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. ट्विट करत ते म्हणाले की या चळवळीमुळे तिरंग्याशी आमचा संबंध अधिक दृढ होईल आणि त्यांनी नमूद केले की 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

Viral Video: पोलीस, बँड-बाजा आणि वरात! अशी अनोखी 'लव्ह मॅरेज' पाहून अख्खी वस्ती नाचली; व्हिडिओ पाहून नेटकरीही म्हणाले...

Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT