Bodgeshwar Temple election Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Jatra 2026: श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाची तारीख जाहीर, म्हापशात कार्यक्रमांची रेलचेल; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Mapusa Bodgeshwar Jatra: म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वरचा ९१ वा महान जत्रोत्सव शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश: म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वरचा ९१ वा महान जत्रोत्सव शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. या देवस्थानाचा ३३ वा वर्धापनदिन, १ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त दि. १ ते ८ जानेवारी असे आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

गुरुवार, १ रोजी १० वा. श्री देव बोडगेश्वरच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३३ वर्धापनदिनानिमित्त मंदिरात सकाळी लघुरुद्र, पूजा, आरती, सायं. ५ वा. श्री म्हात्राई काळभैरव महिला भजनी मंडळाचे भजन होईल. सायं. ७ वा. सुवासिनींतर्फे दीपोत्सव, रात्री ८.३० वा. ओम सत्यसाई सेवा मंडळातर्फे भजन होईल.

शुक्रवार, २ रोजी दु. १२ वा. श्री देव बोडगेश्वराच्या ९१ व्या महान जत्रोत्सव सुरू होईल.सायं. ५.३० वा. स्वर भगिनी प्रस्तुत अभंग, भावगीत व नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम सायं. ७.३० वा. ‘गीतबहार’ हा कार्यक्रम होईल. रात्री १२ वा. दशावतारी नाटक ‘मायाजाल’ होईल. शनिवार, ३ रोजी १० वा. देवस्थानतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ५.३० वा. भजन, ७.३० वा. ‘फुलले रे क्षण माझे’ हा कार्यक्रम होईल.

रविवार, ४ रोजी १० वा. ‘पिकअप-ड्रायव्हर’तर्फे श्री सत्यनारायणपूजा, सायं. ५.३० वा. ''संगीत संध्या'' कार्यक्रम, सायं. ७.३० वा. ‘स्वरधारा’ कार्यक्रम होईल. मंगळवार, ६ रोजी सकाळी १० वा. ‘रिक्षा-ड्रायव्हर’ (कदंब स्टॅंड) तर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं ५.३० वा. ‘नृत्य मार्ग’ होईल. सायं. ७.३० वा. ‘स्वर गंधार’ कार्यक्रम होईल.

बुधवार, ७ रोजी १० वा. म्हापसा पालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ५.३० वा.भक्तीगीत कार्यक्रम होईल. सायं. ७.३० वा. ‘स्वर ईश्वर’ कार्यक्रम होईल. गुरुवार, ८ रोजी १० वा. म्हापसा भाजी विक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ५.३० वा. आराधना नृत्य कला केंद्र रक्षेदा महेंद्र आमोणकर प्रस्तुत शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याविष्कार, सायं. ७.३० वा. सांज सूरांची गायन कार्यक्रम होईल.

सोमवारी वेशभूषा स्पर्धा

सोमवार, ५ रोजी सकाळी १० वा. म्हापशातील मासळी विक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायणपूजा, सायं. ५ वा. वेशभूषा स्पर्धा होईल. (वयोगट ते ९ व १० ते १४) स्पर्धेची बक्षिसे अनुक्रमे रु.३ हजार, रु. २५००, रु.२ हजार, रु.१ हजार २ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. (स्पर्धकांनी संध्या ४ वा. हजर राहावे). सायं. ७ वा. निधी स्कूल ऑफ डान्स यांचे भरतनाट्यम् होईल. रात्री ८.३० वा. ‘स्वर अनंत’ कार्यक्रम होईल. दररोज दुपारी १ वा. महाप्रसाद होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्तगाळी जीवोत्तम मठ 2 जानेवारीपासून बंद! भाविक-पर्यटकांना प्रवेशबंदी; अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी समितीचा निर्णय

Goa Job Scam: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून 'इतक्या' लाखांचा गंडा; वार्का येथील रहिवाशाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

31 डिसेंबरपूर्वी उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं; अन्यथा नवीन वर्षात बसू शकतो आर्थिक फटका

क्रिकेट विश्वावर शोककळा! अ‍ॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Goa ZP Elections: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी रिंगणात

SCROLL FOR NEXT