Shree Dev Bodgeshwar Jatra Dainik Gomatnak
गोवा

Bodgeshwar Jatra: "पूर्वी म्हापशात जत्रेचा फलक पाठीवर घेऊन, ढोल-ताशा वाजवत दवंडी पिटली जायची"; बोडगेश्वर जत्रेचा इतिहास

Shree Dev Bodgeshwar Jatra: फार पूर्वी म्हापशात आमच्या लहानपणी या जत्रेची जाहिरात फलक पाठीवर घेऊन आणि ढोल-ताशा वाजवत दवंडी पिटल्यासारखी शहरभर फिरून केली जायची.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वराची वार्षिक जत्रा, हा म्हापसेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. फार पूर्वी म्हापशात आमच्या लहानपणी या जत्रेची जाहिरात फलक पाठीवर घेऊन आणि ढोल-ताशा वाजवत दवंडी पिटल्यासारखी शहरभर फिरून केली जायची. आता मीडियावर जत्रेची जाहिरात केली जाते. पूर्वी दीड दिवसाची असणारी ही जत्रा आता पाच दिवस आणि त्याहून अधिक दिवस विविध कार्यक्रमांनिशी साजरी होते.

जत्रेतली काही दुकाने तब्बल पंधरा-वीस दिवस बस्तान ठोकून असतात. जत्रेतील पाळणे हे लहान-थोरांचे भलतेच आकर्षण असते. वेगवेगळे खेळांचे प्रकार, तसेच खेळण्यांची, खाज्यांची, मिठाईची, भांड्यांची, कागदी वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने असतात.

एकेकाळी दत्तवाडी हा भाग सर्वांत उंचावरील समजला जायचा. पण आता त्याही पुढे जाऊन कॉलेजच्या पुढे विस्तीर्ण पठारावर बसलेल्या गणेशपुरीत प्रशस्त असे गणपतीचे देऊळ उभे राहिले आहे. ‘संग्राम गणेश’ असे नाव लाभलेल्या त्या देवस्थानचा उगम संघर्षातून झाल्याने त्याला ‘संग्राम गणेश’ म्हणतात.

खोर्लीतही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन आणखी एका गणपती देवस्थानाची भर पडली आहे. अन्साभाट या उंचावरील भागात पुष्कळ पायऱ्या चढून जावे लागणाऱ्या भागात आणखी एका गणपती देवस्थानाची भर पडली आहे.

न्यायालय इमारतीच्या परिसरात समता संवर्धनेच्छू समाजाचे विठ्ठल-रखुमाईचे छोटेखानी मंदिर आहे. काणका येथे साईबाबांचे प्रशस्त मंदिर असून साईंची मूर्ती तर शिर्डी येथील मूर्तीसारखीच दिसते. त्यामुळे हे मंदिर प्रतिशिर्डी गणले जाते.

तिथेही गुरुवार साजरे केले जातात. टॅक्सी स्टॅण्डवरही घुमटीवजा मंदिरात साईबाबा विराजमान आहेत. तिकडेही गुरुवारी नित्यनेमाने साईभक्त आरती करतात. शिरसाट बिल्डिंग परिसरात बाजाराच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे छोटेखानी देऊळ आहे. बाजारपेठेच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मी पूजनोत्सव भक्तिभावाने साजरा होतो.

वाड्यावाड्यांवर अर्थात सीम, अलंकार थिएटर परिसर, शेडाडा, फेअर बायश येथील लक्ष्मी-नारायण देवळासमोर तसेच तारीकडे येथे राष्ट्रोळी विराजमान आहे. डांगी कॉलनीत गोधनेश्वराचे देऊळ वसले आहे. शेट्येवाडा भागातील राष्ट्रोळी देवस्थान बरेच नावारूपाला आले असावे.

म्हापसा शहरात प्रवेश करताना तेथील शेतजमिनीत असलेले देव बोडगेश्वर देवस्थान सर्वांच्या नजरेत भरते. प्रत्येकजण देव बोडगेश्वराच्या चरणी वाहायला केळी घेऊन येतात. दर रविवारी बोडगेश्वराच्या परिसराला छोटेखानी जत्रेचे स्वरूप येते. सुंदर प्रकारे हे देऊळ विकसित केल्याने दर्शन सुखाबरोबरच मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेण्यासाठी बोडगेश्वर मंदिर सर्वांचे क्षणभर विसावा घेण्याचे ठिकाण बनले आहे.

त्याचप्रमाणे या जत्रोत्सवात फुलांची, कपड्यांची वेगवेगळी दुकाने जत्रेची शोभा वाढवितात. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात जत्रा भरणार नाही. मोजक्याच दुकानांना परवानगी दिली आहे. तरीही लोक गर्दी करणारच. कारण, कोरोनाचे भय बरेचसे कमी झाले आहे.

जत्रेनिमित्त देवळावर केलेल्या रोषणाईने डोळ्यांचे पारणे फिटते. दारूकामाची आतषबाजीही सुखावणारी असते. दर्शनासाठीच्या लांबच लांब रांगा अंतर ठेवूनच लावाव्या लागतील. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी होणारी ही अशी बोडगेश्वराची वार्षिक जत्रा पारंपरिक दशावतारी नाटकाने भक्तांचे मनोरंजन करते.

मंदिराचा झालेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे. झाडाखाली असलेली बोडगेश्वराची उभी भव्य मूर्ती आश्वासक वाटते. तिथे पंचकेळी भेट देऊन सांगणे करण्याची प्रथा आहे. रविवारी देवळाचा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो.

देवळाच्या समोर उभा दीपस्तंभ देवळाची शोभा वाढवतो. डेरेदार वृक्ष व त्या सावलीत विराजमान मुंडासे बांधलेली आणि कांबळं व हातात काठी असलेली बोडगेश्वराची मूर्ती सजीव वाटते. त्यांच्या सान्निध्यात थोडा वेळ बसल्याने भाविकांना मनःशांती लाभते. श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवानिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!

-प्रकाश चंद्रकांत धुमाळ, म्हापसा- गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India New Coach: टीम इंडियाला मिळणार नवा कोच, इंग्लंडचा 'हा' दिग्गज सांभाळणार जबाबदारी

पत्रकारितेसाठी 2025 ठरले रक्तरंजित! जगभरात महिला पत्रकारांसह 128 जणांची हत्या, 'हे' भाग ठरले सर्वात धोकादायक; रिपोर्टमधून खुलासा

VIDEO: बागा बीचवर 'मिल्की ब्युटी'चा धमाका! तमन्नाच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सनं लावलं वेड; गोव्याच्या समुद्रकिनारी रंगली न्यू इयर पार्टी

'पाश्चात्य देशांनी लसींचा साठा केला, पण भारतानं जग वाचवलं!', कोविड लसीकरणावरुन जयशंकर यांची IIT मद्रासमध्ये तूफान फटकेबाजी VIDEO

New Kia Seltos Launch: क्रेटाचं टेन्शन वाढलं! किआ सेल्टोस नव्या अवतारात लाँच; पाहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT