mapua Dainik Gomantak
गोवा

Mapusa Sewer Work : म्हापशात रात्रीच्या वेळी गटार उपसण्याचे काम; कचरा उघड्यावर

Mapusa Sewer Work : सध्या अलंकार टॉकीज जवळील रस्त्याच्या बाजूची गटारांची साफसफाई रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याचे दिसून येते.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Sewer Work :

बार्देश, म्हापसा पालिका क्षेत्रातील काही भागातील रस्त्याच्या बाजूची गटारे साफ करण्याचे काम रात्रीचेही सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे काम पूर्ण होणे आवश्यक होते, पण हे काम न झाल्याने कंत्राटदाराला रात्रीचे काम करण्याची वेळ आली आहे.

दरवर्षी म्हापसा पालिका असाच अनागोंदी कारभार करते. पाऊस जवळ आल्यानंतरच गटार उसवण्याचे काम किंवा रस्ते दुरुस्ती करण्याचे काम हाती घेते. त्यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागतो, असे स्थानिकांचा दावा आहे.

सध्या अलंकार टॉकीज जवळील रस्त्याच्या बाजूची गटारांची साफसफाई रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याचे दिसून येते.

या गटारामध्ये असलेला केरकचरा तसेच चिखल काढून रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

गटारांतील कचरा तसेच चिखल रस्त्यावर साठवून ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे या रस्त्यावरून जाताना दुर्गंधी सहन करावी लागते. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

— सुदेश तिवरेकर, वाहनचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT