

Harvalem Rath Yatra : गेल्या वर्षी समाजाला संघटित करण्यासाठी माजी मंत्री रवी नाईक यांच्या संकल्पनेतून रुद्रेश्वर रथयात्रा काढण्यात आली, यातून समाजाला एकत्र येण्याचा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या स्वप्नासाठी भंडारी समाजाने एकत्रित यावे, असे आवाहन प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले.
हरवळे साखळी येथे रुद्रेश्वर रथयात्रा वर्षपूर्तीनिमित्त रुद्रेश्वर रथोत्सव समिती व रुद्रेश्वर देवस्थान समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते.
भंडारी समाज आज सर्वच क्षेत्रात मोठी भूमिका वठवत आहे, त्यामुळे या समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करावे. तसे झाल्यास या समाजाला भविष्यात चांगलीच उभारी प्राप्त होईर, असेही स्वामी ब्रह्मेशानंद यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, माजी मंत्री दिलीप परूळेकर, जयेश साळगावकर, श्याम सातर्डेकर, माजी सभापती नरहरी हळदणकर, माजी आमदार दयानंद सोपटे, किरण कांदोळकर, रितेश नाईक, अमित पालेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर, रथोत्सव समितीचे अध्यक्ष माजी मंत्री दयानंद मांद्रेकर आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, आपला समाज व धर्म याबरोबरच देशही आपलीच जबाबदारी आहे. भंडारी समाज हा राज्यातील मोठा समाज असून या समाजाने आपली ताकद ओळखून संघटितपणे कार्य केल्यास भविष्यात या समाजाचा उत्कर्षच होईल, असे ते म्हणाले.
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, भंडारी समाजातील मुलांनी शिक्षण, आरोग्य व व्यवसाय या तीन गोष्टींमध्ये पुढे यावे. हरवळेतील रुद्रेश्वर मंदिर हे भंडारी समाजाचे केंद्रस्थान असून या मंदिराच्या परिसरात संस्कृत व संस्कार शिक्षणाची सोय असावी, जेणेकरून आमची पुढील पिढी सुसंस्कृत करण्यात आम्हाला बळ मिळेल.
प्रास्ताविक दयानंद मांद्रेकर यांनी केले. स्वागत देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी केले. सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. मशाल आडपईकर यांनी आभार मानले.
या सोहळ्यात नुकत्याच निवडून आलेल्या भंडारी समाजातील जिल्हा पंचायत सदस्य राघोबा कांबळी, तारा हडफडकर, श्रीकृष्ण हरमलकर, नारायण मांद्रेकर, नीलेश कांबळी, कुंदा मांद्रेकर, सुंदर नाईक, तृप्ती बकाल, समीक्षा नाईक, गणपत नाईक, डॉ. गौरी शिरोडकर यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे येथे उपस्थित राहून रुद्रेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, देवस्थान अध्यक्ष यशवंत माडकर व इतरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.