

पणजी: गोव्यात मुख्यालय असलेल्या ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीच्या ताफ्यात दोन नवीन एटीआर ६०० विमाने दाखल होणार आहेत. यामुळे कंपनीने आपल्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमध्ये विजयवाडा, राजमुंद्री, नांदेड, दाबोळी आणि हुबळी या शहरांचा समावेश केला आहे.
यूएई मुख्यालय असलेल्या जागतिक विमानसेवा प्रदाता दुबई एअरोस्पेस एंटरप्राइझकडून दोन एटीआर ७२-६०० टर्बोप्रॉप विमाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. ही दोन नवी विमाने या महिन्याच्या उत्तरार्धात फ्रान्समधील टुलूज येथील उत्पादन केंद्रातून मिळणार आहेत. त्यानंतर ‘फ्लाय ९१’ आपल्या क्षमतेत तसेच उड्डाणांच्या संख्येत वाढ करणार, अशी माहिती विमानसेवेकडून प्राप्त झाली आहे.
“नियंत्रित व टप्प्याटप्प्याने वाढ साधत सक्षम आणि विस्तारक्षम प्रादेशिक विमानसेवा उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला हा व्यवहार अधिक बळ देणारा असून एटीआर ७२-६०० हे अल्प पल्ल्याच्या प्रादेशिक मार्गांसाठी कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि कामगिरी यांचा आदर्श समतोल देणारे आमच्या कार्यपद्धतीचे महत्त्वाचे अंग आहे;
डीएईसोबतची पुन्हा एकदा झालेली भागीदारी आर्थिक शिस्त आणि भांडवली कार्यक्षमतेची जपणूक करत ताफा विस्तारण्यास आम्हाला मदत करणार आहे,” असे ‘फ्लाय-९१’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी सांगितले. मार्च २०२४ मध्ये व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात केल्यानंतर ‘फ्लाय-९१’ने गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सोलापूर, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्ती यांच्याशी जोडणारे प्रादेशिक जाळे उभारले आहे. तसेच पुणे, बंगळुर आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरी केंद्रांनाही जोडणी उपलब्ध करून दिली आहे.
नवीन दोन नव्या विमानांच्या समावेशानंतर ‘फ्लाय-९१’च्या ताफ्यातील एकूण विमानांची संख्या सहा होईल. टियर-२ आणि टियर-३ शहरांपर्यंत आपले जाळे विस्तारण्याच्या कंपनीच्या ठोस धोरणाला हा महत्त्वाचा टप्पा बळकटी देणारा असून प्रादेशिक हवाई संपर्क अधिक मजबूत करण्याच्या उद्दिष्टाकडे हे एक निर्णायक पाऊल आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.