Mapusa School Crime  Dainik Gomantak
गोवा

'आय एम बॅक' लिहून शोळेत सिनेस्टाईल तोडफोड, जाळपोळ; म्हापशात गूढ घटनेने खळबळ

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: शहरातील एका शाळेच्या तळमजल्यावरील गेटचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून मोठ्या प्रमाणात मालमत्तेची तोडफोड केली. हा प्रकार शुक्रवारी (ता.९) सकाळी ६.३० वा. उघडकीस आला. म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शालेय व्यवस्थापनाचे सुमारे ५ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अज्ञातांनी घुसखोरी करत शाळेतील साहित्यांची व कागदपत्रांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

शुक्रवारी सकाळी शाळा भरण्याच्या वेळी कर्मचारी आले असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण केले. या घटनेनंतर शालेय व्यवस्थापनाने वर्ग भरविले नाहीत. विद्यार्थ्यांना माघारी पाठवले. सध्या मुलांची युनिट चाचणी सुरू असून दोन पेपर शिल्लक होते.

मात्र, या प्रकारामुळे व्यवस्थापनाने आज व उद्या शनिवारी दोन दिवस शाळांना सुट्टी दिली. त्यामुळे सोमवारी (ता.१२) रोजी उर्वरित परीक्षा प्रक्रिया पार पडेल. याप्रकरणी शाळेचे मॅनेजर हे फिर्यादी असून पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(४), ३२४(५) अन्वये गुन्हा नोंद केला.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक बाबलो परब यांनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले.

विध्वंसामागील हेतू गुलदस्त्यात

मुख्याध्यापिका केबिनमधील टीव्ही फोडून अज्ञाताने या टीव्हीच्या स्क्रीनवर धारदार वस्तूने इंग्रजीमध्ये ‘आय एम बॅक’ असे लिहिले होते. तसेच केबिनमधील कागदपत्रांची होळी केली. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वाहिन्या जाळल्या. तसेच स्टाफरुमधील गिटार, खेळणी तसेच लॉकरमधील कर्मचाऱ्यांचे साहित्य बाहेर काढून अस्तव्यस्त टाकले.

अज्ञातांनी कुलूप तोडण्यापासून शाळेच्या मालमत्तेच्या तोडफोडीसाठी दोन रॉड व स्क्रू ड्रायव्हर सोबत आणले होते. हे साहित्य संशयितांनी घटनास्थळीच टाकून पोबारा केला. पोलिसांनी या वस्तू जप्त केल्या आहेत.

कर्ज झाल्याने मंदिरांना केले लक्ष्य

मांद्रेतील मंदिर चोरी प्रकरणात पोलिसांनी ओरोस (सिंधुदुर्ग) येथून संशयित विनोद पटेकर (रा. मांद्रे) याला अटक केली. लाखो रुपयांचे कर्ज असल्याने ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मांद्रे येथील हनुमान मंदिरात ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. याच धर्तीवर केरी येथील आजोबा मंदिरात चोरी झाली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT