Goa Crime: म्हापसा कचरा संकलन केंद्राजवळ आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह!

Dead Body Found At Mapusa: या मृतदेहाला किमान आठ दिवस झाले असावेत मात्र कर्मचारी किंवा इतरांना याबाबत काहीच कळले नाही
Dead Body Found At Mapusa: या मृतदेहाला किमान आठ दिवस झाले असावेत मात्र कर्मचारी किंवा इतरांना याबाबत काहीच कळले नाही
Dead Body Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा बसस्थानक येथील पालिकेच्या कचरा संकलन केंद्राजवळील पत्र्याच्या शेडमध्ये एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी (ता.८) सायंकाळी संबंधित घटना उघडकीस आली.

धक्कादायक म्हणजे या मृतदेहाला किमान आठ दिवस झाले असावेत. मात्र, पालिका कर्मचारी किंवा इतरांना या मृतदेहाबाबत काहीच कळले नाही. यातूनच येथील कचरा वेळेत उचलला जात नाही, हेच अधोरेखित होते.

उपलब्ध माहितीनुसार, या कचरा संकलन केंद्राजवळून दुर्गंधी येत असल्याने काहींनी जवळ जाऊन पाहिले असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर, म्हापसा पोलिसांना याची माहिती दिली. या केंद्राजवळील मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो; परंतु वेळेत कचरा उचलला जात नसल्याने मार्केट परिसराचा प्रवेशद्वार सध्या उकिरडा बनला आहे.

Dead Body Found At Mapusa: या मृतदेहाला किमान आठ दिवस झाले असावेत मात्र कर्मचारी किंवा इतरांना याबाबत काहीच कळले नाही
Dead Body Found: माजोर्डा रेल्वे रुळाजवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; तपास सुरू

बेघरांचे आसरा केंद्र

बेघर लोकांकडून रात्रीच्या वेळी या शेडचा वापर आसरा केंद्र म्हणून केला जातो. याशिवाय इतरही गैरप्रकार घडतात, असा आरोप स्थानिकांनी केला. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविला. नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर, पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखील पालेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com