Goa Police Crime Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्को पोलिस ‘अलर्ट मोड’वर! ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन; खबरदारी घेण्याची सूचना

Goa Police: वास्को पोलिस स्थानकात घेण्यात आलेल्या या बैठकीला वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुदास कदम, निरीक्षक वैभव नाईक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: म्हापसा येथील दरोड्यामुळे पोलिस ‘अलर्ट मोड’वर आले आहेत. त्यामुळे वास्को पोलिसांनी गुरुवारी सकाळी ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या, तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्या खबरदारी घ्याव्यात यासंबंधी मार्गदर्शन केले.

वास्को पोलिस स्थानकात घेण्यात आलेल्या या बैठकीला वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुदास कदम, निरीक्षक वैभव नाईक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यात आल्या. काही ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी मांडल्या. त्या दूर करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.

कदम यांनी सांगितले की, ज्येष्ठांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यासाठी आम्ही वेळोवेळी बैठका घेतो. त्याचा एक भाग म्हणून ही बैठक बोलाविण्यात आली होती. तसेच सायबर क्राईमपासून कसा बचाव करावा यासंबंधी ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठांनी जर भाडेकरू ठेवले असतील, तर त्यांची माहिती पोलिस स्थानकात देण्याची विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे एटीएममध्ये जाताना कोणती खबरदारी घ्यावी यासंबंधीही मार्गदर्शन करण्यात आले.

अनोळखींवर विश्‍वास ठेवू नका!

अनोळखी व्यक्तींवर विश्र्वास ठेऊ नका, एखाद्या गोष्टीवद्दल संशय आल्यास पोलिसांना माहिती द्या. जेथे ज्येष्ठ जोडपे किंवा एकाकी राहतात तेथे पोलिस गस्त वाढविण्यात येणार आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर साठी ज्येष्ठांना त्या ठिकाणच्या बीट पोलिसाचा मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे, असे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT