Mapusa Crime Dainik Gomantak
गोवा

रस्त्यामधे थांबवली कार, पोलिसाच्या गाडीची किल्ली काढून घेतली; म्हापशात पर्यटकांची मुजोरी; कर्नाटकच्या 5 जणांना अटक

Mapusa Karnataka Tourist Misbehaviour: म्हापसा वाहतूक पोलीस स्थानकाशी संलग्न असलेला कॉनी मास्कारेन्हस हा आयआरबी कॉन्स्टेबल पोलिस स्थानकावरून आपली कार घेऊन कोलवाळ येथे नियुक्त सेवास्थळी जात होता.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: रस्त्यावर मध्येच कार थांबविण्याच्या शुल्लक कारणावरून आयआरबी पोलीस कॉन्स्टेबलला जाब विचारत त्याच्या गाडीची चावी काढून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दोड्डाहसन (कर्नाटक) येथील पाच पर्यटकांना म्हापसा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईखाली अटक केली.

ही घटना, म्हापसा शहरातील मारूती मंदिरासमोरील रस्त्यावर ९ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. म्हापसा वाहतूक पोलीस स्थानकाशी संलग्न असलेला कॉनी मास्कारेन्हस हा आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल पोलिस स्थानकावरून आपली कार घेऊन कोलवाळ येथे नियुक्त सेवास्थळी जात होता.

अटक केलेल्यांमध्ये अनिल राजन गौडा (३३), मनू रंगे गौडा (३०), नवीन स्वामी गौडा , सागर रंगे गौडा (२५) व अविनाश स्वामी गौडा (२८) सर्व दोड्डा, हसन-कर्नाटक यांचा समावेश आहे.

जमाव पोलिसाच्या मदतीला

घटनेवेळी हुतात्मा चौक येथे वाहतूक कोंडी होती. त्यामुळे मास्कारेन्हस यांनी आपली कार घटनास्थळी थांबवली. या कारच्या मागून संशयित पर्यटक हे आपल्या कारने येत होते. कार मध्येच उभी केल्याच्या कारणावरून पाचही संशयित हे आपल्या गाडीतून बाहेर आले.

त्यांनी आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल मास्कारेन्हस याच्या कारच्या काचावर हात मारत त्यांना जाब विचारला. तसेच कारची चावी हिसकावून घेत आपली कार मागे घेऊन तिथून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेला जमाव पोलिसाच्या मदतीला धावून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT