Crime News Dainik Gomantak
गोवा

म्हापशात 'रेंट-अ-बाईक' चालकांमध्ये थरार! वादातून एकाने दुसऱ्याचा कानच तोडला; भररस्त्यातील रक्तापाताने हादरले नागरिक

Rent-A-Bike Clash Mapusa: म्हापसा शहरात सोमवारी (29 डिसेंबर) रात्री दोन 'रेंट-अ-बाईक' चालकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली.

Manish Jadhav

म्हापसा: म्हापसा शहरात सोमवारी (29 डिसेंबर) रात्री दोन 'रेंट-अ-बाईक' चालकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या एका चालकाने दुसऱ्या चालकाचा कानच दाताने तोडून काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेतील गंभीर जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा शहरात सोमवारी रात्री दोन रेंट-अ-बाईक चालकांमध्ये कोणत्यातरी विषयावरुन बाचाबाची सुरु झाली. पाहता पाहता या वादाने रौद्र रुप धारण केले आणि दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या संघर्षादरम्यान आरोपीने अत्यंत हिंसक पवित्रा घेत समोरच्या व्यक्तीच्या कानाचा काही भाग दाताने तोडून टाकला. भररस्त्यात झालेला हा रक्तापात पाहून स्थानिक नागरिक आणि पर्यटक भयभीत झाले.

पीडित आणि आरोपीची ओळख

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नितेश कांदोळकर असे असून तो बस्तोडा येथील तेलिया वाडो येथील रहिवासी आहे. नितेश स्वतः रेंट-अ-बाईक चालवतो. त्याला तातडीने म्हापसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवले. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी समीर पेडणेकर याला ताब्यात घेतले.

पोलिसांची कारवाई आणि तपास

घटनेची माहिती मिळताच म्हापसा (Mapusa) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. या वादाचे नेमके कारण काय होते? जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला की व्यवसायातील स्पर्धेतून? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे म्हापसा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पर्यटकांच्या गर्दीच्या काळात अशा घटना घडल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT