Goa Crime: कामाच्या मजुरीवरून उडाले खटके, मालकाला आणि सासूला कायमचे संपवले; दुहेरी खूनप्रकरणी दोघा आरोपींना जन्मठेप

Fatorda double murder case: दुहेरी खून प्रकरणातील रविनकुमार सडा आणि आकाश घोष या दोघांना गोवा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तसेच त्यांना पन्नास हजारांचा दंडही सुनावला.
Arrest
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: चंद्रवाडा-फातोर्डा येथे चार वर्षांपूर्वी सर्वांना हादरवून टाकणाऱ्या दुहेरी खून प्रकरणातील रविनकुमार सडा आणि आकाश घोष या दोघांना गोवा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तसेच त्यांना पन्नास हजारांचा दंडही सुनावला. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला.

८ मार्च २०२१ रोजी दुहेरी खुनाची घटना घडली होती. संशयितांनी मिंगेल मिरांडा आणि त्यांची सासू कातरिना पिंटो या दोघांचा निर्घृण खून केला होता. संशयितांचा अन्य एक अल्पवयीन सहकारी होता.

सर्व संशयित मिंगेल यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहात होते. मिरांडा हे कंत्राटदार असल्याने त्यांनी या सर्वांना मजूर म्हणून आपल्याकडे कामाला ठेवले होते. या खटल्यात प्रथमदर्शनी साक्षीदार नव्हते. फातोर्डा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी या प्रकरणातील संशयितांना अटक केली होती.

Arrest
Goa Crime: बाजारात पार्क केलेल्या टेम्पोत आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह; खुनाचा संशय, पोलिस, फॉरेन्सिक पथक दाखल

सरकार पक्षातर्फे वकील उत्कर्ष आवडे यांनी या खटला हाताळला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. आवडे यांनी न्यायालयात भक्क्म युक्तिवाद करून संशयितांवरील आरोप सिध्द केले.

Arrest
Goa Crime: एका क्षणाचा राग अन् संसाराची राखरांगोळी! नवऱ्याशी भांडण होताच बायकोनं संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं हादरलं सांकवाळ

कामाच्या मजुरीवरून भांडण!

खुनाच्या घटनेनंतर संशयित फरार झाले होते. दुसऱ्या दिवशी त्या सर्वांना मुबंईत शिवाजी पार्क येथे जेरबंद केले होते. संशयित व मिरांडा यांच्यात कामाच्या मजूरीवरून भांडण होत होती. त्यातूनच खुनाची वरील घटना घडली होती. न्यायालयात सरकारपक्षाने पुराव्यानिशी ते सिद्ध केले होते. भारतीय दंड संहितेच्या ३०२ (खून) तसेच २०१ (पुरावा नष्ट करणे) ३९७ (चोरीच्या उद्देशाने खून करणे) या आरोपाखाली वरील दोघांना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा ठोठावली. ३९७ कलमाखाली त्यांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
America Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com