Ballot Box dainikgomantak
गोवा

मतदान पेटीशी छेडछाडीची आरजीची तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असून 10 मार्चला मतमोजनी होणार आहे. पण मतमोजनी आधीच आरोपांच्या फैरी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहेत. सध्या राज्यात मतदान पेटीशी छेडछाडीचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून वेगळ्याच चर्चांना उत येत आहे. तर यासंबंधात आरजीचे रोहन सांळगावकर यांनी म्हापसा पोलिस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पणजीतील निवडणुक निर्वाचन अधिकार्यांच्या कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली असून या घटनेमागचे गुढ शोधून काढण्याची मागणी केली आहे. (Mapusa Postal Ballot sealed Opened without any permission Allegations from Revolutionary Party)

राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुक (Assembly elections) पार पडली असून त्याची 10 मार्चला मतमोजनी होणार आहे. तर निवडणुकीवेळी म्हापसा मतदार संघासाठी (Mhapsa constituency) अपंग तसेच वयोवृद्ध व्यक्तींकडून मतदान करण्यात आले होते. त्या मतदान पेटीशी छेडछाड झाल्याचा आरोप रिव्हुलिशनरी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या घटनेने म्हापशात बुधवारी दिवसभर मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले.

दरम्यान, यासंबंधात आरजीचे रोहन सांळगावकर यांनी म्हापसा पोलिस (Mhapsa Police), उत्तर गोवा जिल्हाधिकारी (North Goa Collector Office) कार्यालय तसेच पणजीतील निवडणुक निर्वाचन अधिकार्यांच्या कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली. तसेच त्यांनी या घटनेमागचे गुढ शोधून काढण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) झालेल्या निवडणुकीत एकंदर मतदान (Voting) झालेली बेलॉट मशींन्स तसेच बॉक्सेस (Boxes) म्हापशातील स्ट्राँग रुम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली होती. तथापि, निवडणुकीच्या चार दिवस आधी निर्वाचन अधिकार्यांच्या उपस्थितीत वयोवृद्ध तसेच अपंग व्यक्तींकडून झालेल्या मतदानाच्या पेट्या सुद्धा येथील सुरक्षित बंद खोलीत ठेवण्यात आल्या होत्या.

मात्र आज बुधवारी त्या मतदान पेटीशी छेडछाडी झाल्याचे समोर आले आहे. आज बुधवारी सकाळी आरजीचे नेते रोहन सांळगावकर तसेच त्यांच्या सहकार्यांच्या म्हापसा येथील स्ट्राँग रुमची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात या गोष्टी आल्या. त्यानंतर म्हापसासह राज्यात एकच खळबळ माजली.

दरम्यान, याबाबतीत उत्तर गोवा जिल्हाधिकारी (Collector of North Goa) कार्यालयात जाऊन आरजीच्या कार्यकरत्यांनी विचारणा केली असतां संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. तर दरम्यानच्या कालावधीत त्यासंदर्भातील व्हिडीओ चांगल्याच व्हायरल (Viral) झाल्याने हे प्रकरण अधिकच तापले गेले असून गोंधळात अधीक भर पडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT