worker dies while cleaning solar panels Dainik Gomantak
गोवा

Mapusa: सौरऊर्जा पॅनेल साफ करताना कामगाराचा मृत्यू, म्हापसा येथील घरमालकांवर गुन्हा नोंद

Mapusa Worker Rooftop Death: रत्नागिरी येथील ४७ वर्षीय कामगाराचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: रत्नागिरी येथील ४७ वर्षीय कामगाराचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातानंतर म्हापसा पोलिसांनी दोन घरमालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा येथील राजवाडो भागात राहणारे गॉडविन मेंडीस आणि मौना गौतम मुन्शी यांनी त्यांच्या घरावर बसविलेले सौरऊर्जा (सोलर) पॅनेल साफ करण्यासाठी रत्नागिरी येथील रहिवासी असलेले ४७ वर्षीय महेश जनार्दन दळवी यांना कामावर ठेवले होते. घरमालकांनी महेश दळवी यांना उंचीवर काम करण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती.

तसेच छतावर काम करताना घ्यायची कोणतीही कायदेशीर खबरदारी न घेतल्याने २३ मे रोजी दुपारी हे काम सुरू असताना महेश दळवी हे छतावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी म्हापसा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजीत मेघनाथ नाईक यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT