Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापसा पालिका क्षेत्रातील बेवारस पाण्याच्या विहिरी विनावापर पडून, पालिकेचे दुर्लक्ष; उपाययोजना करण्याची मागणी

Mapusa municipality: म्हापसा पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बेवारस पाण्याच्या विहिरी असून त्या विनावापर पडून आहेत.

Sameer Amunekar

बार्देश: म्हापसा पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बेवारस पाण्याच्या विहिरी असून त्या विनावापर पडून आहेत. या विहिरींत झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे त्याठिकाणी विहीर आहे की नाही हे कळत नाही. अशा विहिरी म्हापसा पालिकेने पाहून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

म्हापसा शहरातील आणि आजूबाजूच्या भागात अनेक घरे विनावापर आणि जुनी झालेली आहेत. ती पोर्तुगीजकालीन असून अनेक घरांचे घरमालक हे परदेशात नोकरीनिमित्त गेले आणि त्याच ठिकाणी स्थायिक झाले. त्यामुळे त्यांची येथील घरे ही रिकामी आहेत. ती रिकामी असल्याने त्याचबरोबर त्या घरांची देखभाल कुणी करत नसल्याने मोडकळीस आलेली आहेत.

तसेच त्या घरांना असलेल्या विहिरी वापराविना राहिल्याने त्या विहिरींत खालपासून वरपर्यंत झाडे वाढल्यामुळे तेथे विहिरी आहेत हेही दिसून येत नाहीत. म्हापसा शहरात अशी मोडकळीस आलेली अनेक घरे दिसून येतात. म्हापसा पालिकेने याकडे लक्ष देऊन त्या घरांचे मालक कोण आहेत. त्याचा शोध घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे.

अनेक घरे आहेत ती पडत आहेत. तर काही घरांवर वेली, झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे अशी घरे शहरांच्या विद्रूपीकरणास कारण ठरत आहेत. याकडे म्हापसा पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

गेल्या महिन्यात म्हापसा येथील मारुती मंदिरच्या मागे असलेल्या पेडणेतील देशप्रभू यांच्या घरात बोरकर नामक एक डॉक्टर क्लिनिक चालवत होते; पण कालांतराने त्यांचे निधन झाल्याने ते घर तसेच रिकामे राहिले आणि गेल्या महिन्यात ते सकाळच्या वेळी कोसळले. म्हापसा पालिकेने अशा ज्या बेवारस विहिरी आहेत. त्यांची पाहणी करून त्यावर उपाय योजना करावी.

दुर्घटना घडू शकते!

अनेक विहिरी या अडगळीच्या जागी आहेत आणि त्याठिकाणाहून जास्त कुणी ये-जा करीत नाही. त्यामुळे कुणी एखाद्याने त्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली किंवा कुणी मद्यपी किंवा येणारा-जाणारा माणूस आत पडला तर ते कळणारही नाही, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: मेस्सी आला अन् मैदानात तूफान राडा, चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या, टेंट उखडले, काहीजण जखमी Watch Video

'कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते देव वाटत असले तरी सरकारवरील टीका रोखण्यासाठी कायद्याचा वापर करता येत नाही'; म्हापसा कोर्ट

Goa Live Updates: 'कॅश फॉर जॉब'ची राष्ट्रपतींकडून दखल

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री झाले न्यायाधीश!

Radical Prostatectomy: डॉ. केदार्स मॅटर्निटीमध्‍ये 'रॅडिकल प्रोस्टेटक्टॉमी' यशस्वी, कर्करोग उपचारात मोठे पाऊल; डॉ. शर्मद कुडचडकर यांची कामगिरी

SCROLL FOR NEXT