FC Goa vs Al Nassr: फातोर्डा मैदानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त, आज रंगणार एफसी गोवा-अल नस्सर यांच्यातील फुटबॉल सामना

FC Goa vs Al Nassr Football Match: २२ रोजी होणाऱ्या एफसी गोवा आणि अल नस्सर एफसी यांच्यातील एएफसी लीग स्पर्धेदरम्यानचा सामना सुरळीत व्हावा यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
FC Goa vs Al Nassr
FC Goa vs Al NassrDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवार, २२ रोजी होणाऱ्या एफसी गोवा आणि अल नस्सर एफसी यांच्यातील एएफसी लीग स्पर्धेदरम्यानचा सामना सुरळीत व्हावा यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांचा ताबा सांभाळणारे पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर यांनी मंगळवारी (ता.२१) स्टेडियम परिसरात या बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. उद्याच्या सामन्यासाठी दक्षिण गोव्यातील सुमारे ६५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस ठेवणार असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली.

FC Goa vs Al Nassr
Goa Politics: 'विरोधकांनी भ्रमात राहू नये', 'नरकासुर' संबोधल्यानंतर CM प्रमोद सावंतांचा जोरदार पलटवार

दरम्यान, या सामन्याच्या नियोजनासाठी बुधवारी दुपारी १२ वा.नंतर स्टेडियमकडे जाणारे सर्व रस्ते नियमित वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश मंगळवारी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांनी जारी केला आहे. सामना संपेपर्यंत हे निर्बंध लागू असतील, असे या आदेशात म्हटले आहे.

FC Goa vs Al Nassr
Goa Rain: मयेसह डिचोलीला चक्रीवादळाचा तडाखा, घरांसह बागायतींना झळ; मालमत्तेची हानी

या निर्बंधकाळात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पासधारक आणि स्थानिक पास दिलेले रहिवासी यांनाच हा रस्ता खुला असेल. सामन्याच्या वेळेत फातोर्डा स्टेडियमजवळील रस्ते पार्किंगसाठी बंद ठेवले असून पार्किंगची सोय अंबाजी परिसरात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com